Huawei Mate X8 पाहिलात का? मोठी स्क्रीन आणि कॅमेरा पाहून सर्वच झाले चकित... लवकरच बदलू शकतो फोटोग्राफीचा अनुभव  
विज्ञान तंत्रज्ञान

Huawei Mate X8 पाहिलात का? मोठी स्क्रीन आणि कॅमेरा पाहून सर्वच झाले चकित... लवकरच बदलू शकतो फोटोग्राफीचा अनुभव

Huawei Mate X8 Launched: चीनमध्ये एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हे नवीन डिव्हाईस पर्पल गोल्ड ब्रोकेड, अझ्युर स्काय ब्लॅक, स्नोई व्हाइट रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आले आहे.

हर्षदा जाधव
  • नव्या स्मार्टफोनचा परफॉर्मंस मागील मॉडेल, 'मेट एक्स7' (Mate X7) च्या तुलनेत 31 टक्क्यांनी अधिक चांगला आहे

  • अद्याप स्मार्टफोनच्या किंमत आणि विक्रीच्या तारखेचा खुलासा करण्यात आला नाही

  • डिव्हाईसमध्ये किरिन 9050 प्रो लॉजिक फोल्डिंग टाउ चिपसेट मिळणार

Huawei Smartphone Launched: टेक कंपनी Huawei ने चीनमध्ये त्यांचा नवीन बुक-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा फोल्ड स्मार्टफोन Huawei Mate X8 या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा त्यांचा नवीन स्मार्टफोन Mate X8 आणि All-Scenario ईव्हेंटदरम्यान लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या फोल्ड स्मार्टफोनमध्ये 8.2 इंच मोठा इनर ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये अधिक चांगले हिंज मॅकेनिज्म आहेत, ज्यामुळे स्क्रीनवर पडणारी क्रीज लक्षणीयरीत्या कमी होते.

हुवावे मेट X8 ची किंमत

कंपनीने अद्याप अधिकृतपणे या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि विक्रीच्या तारखेचा खुलासा केला नाही. तसेच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारांमध्ये कधी लाँच केला जाणार, याची माहिती अद्याप शेअर करण्यात आली नाही. हा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन पर्पल गोल्ड ब्रोकेड, अझ्युर स्काय ब्लॅक, स्नोई व्हाइट, किंगयुन ब्रोकेड आणि डॅनशिया ब्रोकेड रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. डिव्हाईसच्या स्टँडर्ड व्हेरिअंटमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज पर्याय मिळणार आहे. तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये 512GB स्टोरेज पर्याय मिळणार आहे. तर, कलेक्टर्स एडीशनमध्ये 16GB रॅमसह 512GB आणि 1TB स्टोरेज पर्याय मिळणार आहे. (फोटो सौजन्य - X)

हुवावे मेट X8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

हुवावे मेट X8 मध्ये 8.2 इंच इनर ओएलईडी डिस्प्ले आणि 1Hz ते 120Hz पर्यंत एलटीपीओ रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. फोनची पीक ब्राइटनेस 8,000 निट्सपर्यंत जाऊ शकते. या डिव्हाईसमध्ये 6.54 इंच कवर ओएलईडी डिस्प्ले देखील मिळणार आहे. ही स्क्रीन देखील 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते आणि याची पीक ब्राइटनेस 12,000 निट्सपर्यंत जाऊ शकते.

चिपसेट

या डिव्हाईसमध्ये किरिन 9050 प्रो लॉजिक फोल्डिंग टाउ चिपसेट देखील मिळणार आहे. या फोनचा एकूण परफॉर्मंस मागील मॉडेल, 'मेट एक्स7' (Mate X7) च्या तुलनेत 31 टक्क्यांनी अधिक चांगला आहे. डिव्हाईसमध्ये 9-कोर आणि 16-थ्रेड लिनक्सीकोर सीपीयू, मेलून जीपीयू आणि Da Vinci NPU मिळणार आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या नव्या स्मार्टफोनमध्ये Ruiying Z10 मॉड्यूलर कॅमेरा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये 1 इंच 50MP RYYB कॅमेरा, रेड मॅपल सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन देखील मिळणार आहे. इतकंच नाही तर कंपनी यासाठी वेगळा कॅमेरा मॉड्यूल, कंट्रोल हँडल आणि कनेक्टर शेल देखील ऑफर करत आहे. या डिव्हाईसमध्ये 6,200mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Rahul Gandhi on Rajiv Gandhi assassination: हत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक बाबांची सुरक्षा हटवण्यात आली...; राहुल गांधींचा धक्कादायक दावा

Shikshan Sevak Update: शिक्षण सेवक कालावधी कमी होणार? तुटपुंज्या मानधनाविरोधात शिक्षक आक्रमक; वाचा नेमकी मागणी काय?

Aai Tuljabhavani: संकेत तुळजाईच्या अष्टशस्त्रधारिणी महापर्वाचे! प्रेक्षक होणार मुग्ध

Sankashti Chaturthi: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Amla Thecha: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय! घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारा झणझणीत आवळ्याचा ठेचा