या स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?  
विज्ञान तंत्रज्ञान

'या' स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?

itel ने आपल्या City 300 5G स्मार्टफोनसाठी Dark Ruby आणि Mist Beige हे दोन नवीन रंग सादर केले आहेत. यापूर्वी हा फोन Bold Indigo रंगात उपलब्ध होता. ६.६७ इंचांचा १२०Hz डिस्प्ले, T8200 ऑक्टा-कोर 5G प्रोसेसर, ५०००mAh बॅटरी आणि १३MP रिअर कॅमेरा अशी वैशिष्ट्ये असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे.

श्वेता झगडे
  • १४,९९९ रुपयांत 5G स्मार्टफोनचा नवा अवतार

  • itel City 300 5G आता दोन नव्या रंगांत!

  • Dark Ruby आणि Mist Beige व्हेरिएंट सादर

भारतातील टेक्नॉलॉजी ब्रँड itel ने आपल्या City 300 5G स्मार्टफोनसाठी दोन नवीन रंगांचे पर्याय सादर केले आहेत. यामध्ये Dark Ruby आणि Mist Beige या आकर्षक रंगांचा समावेश आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन Bold Indigo या रंगात उपलब्ध होता. आता नवीन रंगांच्या पर्यायांमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार स्मार्टफोन निवडता येणार आहे.

आजच्या काळात स्मार्टफोन खरेदी करताना केवळ फीचर्स आणि किंमतच नव्हे, तर फोनचे डिझाइन आणि रंग यांनाही महत्त्व दिले जाते. ग्राहकांची हीच आवड लक्षात घेऊन कंपनीने City 300 5G साठी नवीन रंग सादर केले आहेत. आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि परवडणारी किंमत यांचा मेळ या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतो.

६.६७ इंचांचा १२०Hz डिस्प्ले

itel City 300 5G मध्ये ६.६७ इंचांचा HD+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि २.५D ग्लास डिझाइन मिळते. त्यामुळे व्हिडिओ पाहणे, सोशल मीडिया वापरणे आणि गेमिंग करताना अधिक स्मूथ अनुभव मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. फोनची जाडी ८.४ मिमी असून, त्याला स्लिम डिझाइन देण्यात आले आहे.

T8200 5G प्रोसेसर आणि ५०००mAh बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये T8200 ऑक्टा-कोर 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. ४GB रॅम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेला हा फोन अॅप्स वापरणे, व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग यांसारख्या दैनंदिन कामांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये UltraLink Free Calling सुविधाही देण्यात आली आहे. बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, City 300 5G मध्ये ५०००mAh क्षमतेची बॅटरी मिळते. यासोबत Type-C चार्जिंग पोर्ट आणि १०W चार्जर देण्यात आला आहे. त्यामुळे कॉलिंग, मेसेजिंग, इंटरनेट ब्राउझिंग आणि व्हिडिओ पाहण्यासारख्या कामांसाठी हा फोन उपयोगी ठरू शकतो.

१३MP रिअर कॅमेरा, ८MP फ्रंट कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३MP ऑटोफोकस रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

किती आहे स्मार्टफोनची किंमत?

itel City 300 5G स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. Dark Ruby आणि Mist Beige या दोन नवीन रंगांमुळे आता ग्राहकांना Bold Indigo व्यतिरिक्त आणखी पर्याय मिळणार आहेत. आकर्षक डिझाइन, 5G कनेक्टिव्हिटी, १२०Hz डिस्प्ले आणि ५०००mAh बॅटरी यांसारख्या फीचर्ससह हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी एक पर्याय ठरू शकतो.

महागड्या SUV कशाला? कमी बजेटमध्ये दमदार टर्बो इंजिन देणाऱ्या या 5 गाड्या पाहाच

डिलिमिटेशन बिलामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी? शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अन् ठाकरे गट आक्रमक

Eknath Shinde on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व खासदारांना महत्त्वाचे निर्देश

Rinku Singh ला लग्नाचे गिफ्ट मिळणार! KKR 'ही' जबाबदारी देणार? इरफान पठाणच्या विधानाने वाढली उत्सुकता

Uttar Pradesh Crime: सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू