जिओने लाँच केली हॅपी न्यू ईअर ऑफर 2027
अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह मिळणार अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा
एका प्लॅनची किंमत 399 आणि दुसऱ्या प्लॅनची किंमत 3,999 रुपये
Jio Recharge Plans: जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी हॅपी न्यू ईअर ऑफर 2027 लाँच केली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर अनलिमिटेड 4G आणि 5G डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर करणार आहे. यातील एका प्लॅनची किंमत 399 आणि दुसऱ्या प्लॅनची किंमत 3,999 रुपये आहे. तसेच, कंपनीने या ऑफरसोबत काही डेटा ॲड-ऑन पॅक देखील सादर केले आहेत, ज्याची सुरुवातीची किंमत केवळ 15 रुपये आहे.
जिओच्या 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. यासोबतच यामध्ये जिओहॉटस्टार मोबाईल+हॉलीवूड सब्सक्रिप्शन, एका वर्षाचे कॅन्व्हा प्रो सब्सक्रिप्शन, जिओगेम्स मोबाईल, फॅनकोड, जिओटिव्ही आणि 50GB जिओएआयक्लाऊड स्टोरेज देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
जिओच्या दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3,999 रुपये आहे. हा एक ॲन्युअल रिचार्ज प्लॅन आहे, याची व्हॅलिडिटी संपूर्ण वर्षभराची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा मिळणार आहे. यासोबतच प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार मोबाईल+हॉलीवूड, 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन, फॅनकोड, जिओटिव्ही आणि 50GB जिओएआयक्लाऊड स्टोरेज देखील मिळणार आहे.
इतकंच नाही तर कंपनीने 5G यूजर्ससाठी दोन नवीन ॲड-ऑन पॅक देखील लाँच केले आहेत. कंपनी 15 रुपयांच्या पॅकमध्ये एका दिवसासाठी अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करत आहे. 25 रुपयांच्या पॅकमध्ये दोन दिवसांसाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.
जिओ 50 रुपयांच्या ॲड-ऑन पॅकमध्ये रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा ऑफर करत आहे. या पॅकची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, प्लॅन्स 24 नोव्हेंबरपासून वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. तर 50 रुपयांचा नाईट डेटा पॅक 26 नोव्हेंबरपासून लाईव्ह होणार आहे. रिचार्ज करण्यापूर्वी मायजिओ ॲप किंवा जिओ वेबसाईट तपासा.