POCO X7 सीरीज ची लाँच डेट कन्फर्म, फास्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेक्सने सुसज्ज 
विज्ञान तंत्रज्ञान

POCO X7 सीरीज ची लाँच डेट कन्फर्म, फास्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेक्सने सुसज्ज

POCO X7 सिरीजच्या उपलब्धतेची पुष्टी ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart द्वारे करण्यात आली आहे. कंपनीची ही आगामी सीरिज या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Poco X6 लाइनअपची उत्तराधिकारी म्हणून लाँच केली जाणार आहे.

हर्षदा जाधव

स्मार्टफोन कंपनी Poco नवीन वर्षात त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन स्मार्टफोन सीरिज POCO X7 या नावाने लाँच केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोन सिरीजची चर्चा सुरु होती. मात्र आता अखेर या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात Poco ची ही नवीन स्मार्टफोन सीरिज भारतत लाँच केली जाणार आहे. या सीरिजमध्ये कोणत्या स्मार्टफोनचा समावेश असणार आहे, याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. POCO X7 स्मार्टफोन सिरीजमध्ये X7 आणि X7 Pro या लाइनअपचा समावेश असणार आहे. ही सीरिज या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Poco X6 लाइनअपची उत्तराधिकारी म्हणून लाँच केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सिरीजबद्दल समोर आलेली संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - X)

फ्लिपकार्टवर विकले जाईल

POCO X7 सिरीजच्या उपलब्धतेची पुष्टी ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart द्वारे करण्यात आली आहे. या सीरिजचे लॉचिंग 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी एका एक्स पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने 'Xceed Limits' या टॅगलाइनसह आगामी सिरीजचा टीझर शेअर केला आहे.

फास्ट परफॉर्मेंससह सुसज्ज

एका पोस्टमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या नाविन्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे दर्शविते की POCO X7 सीरिज फास्ट परफॉर्मंस आणि नवीन वैशिष्ट्यांसह लाँच केली जाऊ शकते. या लाइन-अपमध्ये X7 आणि X7 Pro समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. यात POCO X7 Neo 5G समाविष्ट नसेल. X6 आणि X6 Pro 5G भारतात जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आली होती. X6 हा स्मार्टफोन 21,999 रुपयांच्या किमतीत आणि X6 Pro 5G हा स्मार्टफोन 26,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, Poco X7 हे Redmi Note 14 Pro 5G चे रीब्रँडेड व्हर्जन असण्याची अपेक्षा आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. दरम्यान, X7 Pro ही Redmi Turbo 4 ची रिबॅज केलेली आवृत्ती असेल, जी 2 जानेवारी रोजी चीनमध्ये लाँच होत आहे. अहवालानुसार, आगामी दोन्ही स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे, प्रो मॉडेलला अतिरिक्त 12GB + 256GB कॉन्फिगरेशन मिळेल. ही नवीनतम सीरिज मिड रेंजमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र

Suresh Raine BirthDay, त्याचा 'हा' खास विक्रम तुम्हाला ठाऊक आहेत का?