Japanese Couple Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया  Japanese Couple Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
VIRAL

Japanese Couple Viral Video : घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा प्रेम जुळले! जपानी जोडप्याने लखनौमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न

जपानमधील हिरो चिहारा आणि शिसू या जोडप्याची अनोखी प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. घटस्फोटानंतर चार वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या या जोडप्याने 23 नोव्हेंबर रोजी लखनौमधील गोमती नगर येथील राधा-कृष्ण मंदिरात हिंदू वैदिक पद्धतीने विवाह केला.

sanman jadhav
  • वैदिक परंपरेनुसार विवाह

  • हे जोडपे भारतीय संस्कृतीने खूप प्रभावित

  • सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही बातमी

Japanese Couple Viral Video : सोशल मिडियावर लखनौवच्या एका अशा प्रेमकथेचा व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओने सर्वांना थक्क करून सोडले आहे. या जोडप्याचा व्हायरल व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे. या व्हायरल व्हिडिओची गोष्ट अशी आहे की, जपानचे हिरो चिहारा आणि शिसू यांनी लखनौच्या गोमती नगरमधील राधा-कृष्ण मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. हे जोडपे पूर्वी पती-पत्नी होते, पण काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला होता. पण चार वर्षांनंतर नियतीने त्यांना पुन्हा एकत्र आणले. आता त्यांनी पुन्हा एकदा आपले आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला आहे.

वैदिक परंपरेनुसार विवाह

२३ नोव्हेंबर रोजी पुजाऱ्यांनी मंदिरात वैदिक मंत्रांनी त्यांचा विवाह लावला. त्यांनी सात शपथा घेतल्या, एकमेकांना हार घातला आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले. त्यांची मुले, मित्र आणि कुटुंबीयही लग्नाला उपस्थित होते. संपूर्ण मंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि जयघोषाने दुमदुमला होता. या जपानी जोडप्याने भारतीय पोशाख परिधान करून या लग्न सोहळ्यात वधूने साडी आणि वराने कुर्ता-पायजमा घातला होता.

हे जोडपे भारतीय संस्कृतीने खूप प्रभावित

मिळालेल्या माहितीनुसार या वधू आणि वराने सांगितले की, "हा आमच्यासाठी एक खूप अनमोल अनुभव होता. भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरेच्या भावनेने लग्न केल्याचा आम्हाला खूप आनंद आहे." असे वृत्त आहे की, हे जोडपे भारतीय संस्कृतीने खूप प्रभावित आहे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी जपानऐवजी भारतातील लखनौ शहराची निवड केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही बातमी

या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक कमेंट करत आहेत, "खरे प्रेम कधीच संपत नाही, त्यांनी हे सिद्ध केले आहे." काही जण लिहित आहेत की, घटस्फोटानंतरही प्रेम खरे असेल तर लोक पुन्हा एकत्र येतात.

Tarali Project Controversy: तारळी प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सयाजी शिंदेंनी उघडला कायदेशीर लढ्याचा मोर्चा!

FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

Lions Viral Video : आजूबाजूला सिंहच सिंह, तरीही बाईकस्वार बिनधास्त पुढे; झांबियातील थरारक व्हिडिओ व्हायरल

PM Modi Balen Shah Meet: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना पीएम मोदींची मोठी भेट! IIT कॅपसबाबत घेतला 'हा' मोठा ऐतिहासिक निर्णय

'जहाँ मैटर बड़े होते हैं, वहाँ...'; Rohit & Virat चा पत्ता कट? गिल अन् BCCI ने दिले 'हे' स्पष्ट संकेत