Moradabad Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया  Moradabad Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
VIRAL

Moradabad Viral Video: प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात! महामार्गावर दोन कारमधून तरुणांचे धोकादायक स्टंट

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये महामार्गावर दोन कारमधून तरुणांनी धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कटघर झिरो पॉईंट ते दिल्लीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव कारच्या गेटमधून तरुण लटकताना, तर एकजण कारच्या छतावर बसलेला दिसत आहे.

sanman jadhav
  • हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधला

  • गाडीच्या गेटमधून एक मुलगा बाहेर लटकलेला दिसतोय

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Moradabad Viral Video : लोक सोशल मिडियावर फेमस होण्यासाठी काय करतील याचा काय ठाव ठिकाणा नसतो. लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी विविध युक्त्या वापरतात. यासाठी काहीजण तर आपला जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक काहीही करू शकतील. ज्यात रस्त्यावर आणि इतर विविध महामार्गावर खरतनाख स्टंट केले जातात. यात अशीच एक घटना समोर येत आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. रस्त्यावरील स्टंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधला

व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधला आहे. एक तरुण महामार्गावर दोन गाड्यांसह स्टंट करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ शनिवार रात्री शूट केला असल्याचे म्हटले जाते. या व्हिडिओमध्ये, दोन गाड्यांमधील लोक एकमेकांच्या बाजूने गाडी चालवताना स्टंट करताना दिसत आहेत. दरम्यान, मागून येणाऱ्या वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेट्सही सांगत आहे.

गाडीच्या गेटमधून एक मुलगा बाहेर लटकलेला दिसतोय

महामार्गावर दोन गाड्या स्टंट करत असल्याचा हा व्हिडिओ मुरादाबादमधील कटघर झिरो पॉईंट ते दिल्लीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील आहे. या रात्री शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन्ही गाड्यांच्या गेटमधून मुले बाहेर लटकलेली दिसतात. दोन्ही वाहने भरधाव वेगाने जातात. ज्यामुळे मागून येणाऱ्या कोणत्याही वाहनाला अडथळा येत आहे. एका गाडीच्या गेटमधून एक मुलगा बाहेर लटकलेला दिसतोय तर दुसऱ्या गाडीतील मुलगा गेट उघडे ठेवून गाडीच्या छतावर बसलेला दिसलेला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या गाड्यांच्या मागे गाडी चालवणारी व्यक्ती हा व्हिडिओ चित्रित करत आहे आणि सांगत आहे की, "दोन गाड्या मुरादाबाद महामार्गावर एकमेकांच्या बाजूने धावत आहेत, ज्यामुळे इतर वाहनांना पुढे जाण्यास अडथळा येत आहे आणि पादचाऱ्यांना गैरसोय होत आहे." त्याने वाहनांचे क्रमांकही उघड केले आहेत आणि प्रशासनाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महामार्गावरील अशा स्टंटमुळे केवळ स्टंट करणाऱ्यांसाठीच नव्हे, तर इतर वाहनचालकांसाठीही अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

अपघात की कंत्राटदाराचा निष्काळजीपणा? नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू

Kevin Pietersen: ‘पंचायत ५’मध्ये दिसणार इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू? केविन पीटरसनच्या BTS फोटोने चर्चेला उधाण

PoK Unrest: पाकिस्तानला आता घरातूनच मोठा हादरा! बलुचिस्ताननंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेटला वणवा; 'जानबाज फोर्स'ने फुंकले युद्धाचे रणशिंग

Lifestyle tips: मूड खराब असेल तर वापरा 'Dopamine Menu' ची ट्रिक! रोजच्या छोट्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे राहाल आनंदी

Narendra Modi : 'मन की बात'च्या 140 व्या भागाची देशभर चर्चा; भाजप नेत्यांकडून मोदींच्या उपक्रमाचे कौतुक