फोटो सौजन्य सोशल मीडिया  
World

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Gaza News : गाझा शहरातील अल-जवाजात परिसरात इस्रायली क्वाडकॉप्टर ड्रोनमधून झालेल्या गोळीबारात आठ वर्षांच्या शाहद अब्दुल रझ्झाक अल-नज्जारचा मृत्यू झाल्याचे वाफाने वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. खान युनिसमध्येही एका महिलेला गोळी लागून ती जखमी झाली. या घटनांमुळे गाझातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Chaitanya Pisal
  • ड्रोनमधून झालेल्या गोळीबाळात चिमुकलीचा मृत्यू
  • खान युनूसमध्ये ही महिला जखमी
  • गाझातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Gaza News : आज १० ऑक्टोबर २०२६ रोजी इस्रायल-हमास युद्धाला १,०९८ दिवस पूर्ण झाले आहेत, म्हणजेच बरोबर ३ वर्षे आणि ३ दिवस. युद्धाची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती . या भांडणांमध्ये आत्तापर्यंत पॅलेस्टानी नागरिकांचा खासकरून महिला आणि लहान मुलांचा जास्त संख्येत जीव गेला आहे . तसेच निष्पाप लहान मुले ही मोठ्या प्रमाणात आपल्या जीवाला मुकली आहेत .

अशातच गाझा शहरात इस्रायली गोळीबारात शाहद अब्दुल रझाक अल नज्जार या आठ वर्षाच्या पॅलेस्टानी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . १० ऑक्टोबर २०२६ रोजी पॅलेस्टानी वृत्तसंस्था वाफा ने वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे .

गाझा मधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे . हे आता कुठेतरी जाऊन थांबले पाहिजे .असे सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना निर्माण झालेल्या पाहायला मिळत आहेत .

ड्रोनमधून झालेल्या गोळीबाळात चिमुकलीचा मृत्यू

वाफाच्या वृत्तानुसार गाझा शहरातील अल -जवाजात परिसरात इस्रायली क्वाडकोम्प्टर ड्रोनमधून करण्यात आलेल्या गोळीबारात शाहद या लहान मुलीला लक्ष करण्यात आले . या घटनेत तिचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

खान युनूसमध्ये ही महिला जखमी

दरम्यान गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस येथेही गोळीबारात एक महिला जखमी झाल्याचे वृत्तात म्हंटले आहे . याशिवाय गाझा शहराच्या किनारपट्टीवर इस्रायली नौदलाच्या जहाजांतून गोळीबार करण्यात आला , तर शहराच्या पूर्वेकडील भागात लष्करी वाहनांतूनही गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे .

तसेच यासारख्या हल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची भीती सुद्धा आता निर्माण झाली आहे . कारण इस्रायल आता कोणीच विचारणारा राहिला नसल्यामुळे त्याला हवं तेव्हा हवं ते करण्यास तो मोकळा असल्याचे दिसून येत आहे .

गाझातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गाझामध्ये सातत्याने सुरु असलेल्या हिंसक घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे . खासकरून लहान मुले आणि महिलांना आपला जीव गमवून या संघर्षाची मोठी किंम्मत चुकवावी लागत आहे . आठ वर्षाच्या शाहदचा मृत्यू ही या संघर्षातील मानवी हानीची आणखी एक दुर्दैवी घटना ठरली आहे . गाझातील परिस्थिती सामान्य होण्यासाठी हिंसाचार थांबणे आणि नागरिकांच्या संरक्षणाला प्राधान्य मिळणे महत्वाचे ठरणार आहे .

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका