नाटोचे महासचिल मार्क रुटो (फोटो सौजन्य: सोशल मीडिया) 
World

रशियन तेल खरेदीवरुन नाटो चीफचा कडक इशारा ; भारत आणि चीनला १००% कर लादण्याची धमकी

नाटोचे महासचिल मार्क रुटो यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी या देशांना रशियाशी व्यापार ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामान करावा लागेल असे म्हटले आहे.

स्वराली शहा

नाटोचे महासचिल मार्क रुटो यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी या देशांना रशियाशी व्यापार संबंध ठेवल्यास मुख:त तेल आणि वायू क्षेत्रात कायम संबंध ठेवल्यास १००% दुय्यम कर लागू करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेला गांभीर्याने न घेतल्यास त्यांच्या तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही कडक निर्बंध लादले जातील.

अमेरिकेन सिनेटर्ससोबतच्या बैठकीदरम्यान रुटो यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. मार्क रुटो यांनी आक्रमक शब्दांत स्पष्ट केले आहे की, या देशांनी रशियावर शांतता चर्चेसाठी दबाव आणावा, अन्यथा त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागले. मग, तुम्ही भारताचे पंतप्रधान असे किंवा चीनचे राष्ट्रपती असा परंतु याचा परिणाम तुम्हालाही भोगावा लागेल, अशा शब्दांत रुटो यांनी कडक इशारा दिला आहे.

अमेरिका युक्रेनला नव्या शस्त्र पुरवणार

मार्क रुटो यांचे हे विधान अशा वेळी आले आहे , जेव्हा दुसरीकडे ट्रम्प युक्रेनला नव्या शस्त्रास्त्रांची मदत पुरवणार आहे. ट्रम्प यांनीही, रशियाला ५० दिवसांत युद्ध थांबवण्याचा संदेश दिला आहे. असे न केल्यास रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १००% टॅरिफ लागू केले जाईल असे ट्रम्प यांनीही स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका सिनेटर्स ५००% टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव मांडत आहेत.

यपूर्वी देखील अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पंरतु यावेळी नाटो प्रमुखांनी केलेल्या थेट विधानामुळे भारत, चीन आणि ब्राझील देशांची चिंता वाढली आहे. यामुळे या देशांच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारत आणि चीनचे रशियाशी दीर्घकालीन संबंध

भारत आणि चीन रशियाचे सर्वात मोठे तेल ग्राहक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबदर २०२२ ते २०२५ दरम्यान रशियाच्या तेल निर्यातीचा ३८% भाग भारताने खरेदी केला आहे, तर चीनने ४७% वाटा खरेदी केला आहे. २०२४ मध्ये बारताने १.८ ते २.०७ मिलियन बॅरल तेल रशियाकडून आयात केले असून याची किंमत सुमारे ५२.७३ अब्ज डॉलर्स आहे. परंतु नाटोच्या थेट इशाऱ्यामुळे भारत आणि चीनसारख्या देशांसमोर धोरणात्क आव्हाने उभी राहिली आहेत. रशियाशी भारत आणि चीनचे दीर्घकालीन संबंध आहेत.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका