फोटो सौजन्य सोशल मीडिया  फोटो सौजन्य सोशल मीडिया
World

World News : पश्चिम आफ्रिकेतील सोन्याच्या रिफायनरींची स्पर्धा; उत्पादनापेक्षा शुद्धीकरण क्षमता दुप्पट

पश्चिम आफ्रिकेतील घाना , गिनी ,माली आणि बुर्किना फासो हे देश सोन्याचे शुद्धीकरण स्वतःच्या देशात करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत . मात्र वार्षिक उत्पादन ५८५ टन असताना शुद्धीकरण क्षमता एक हजार टनांवर गेल्याने रिफायनरींच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे .

Chaitanya Pisal
  • चार देशांची सोन्याच्या व्यवसायावर पकड मिळवण्याची धडपड

  • उत्पादन कमी , रिफायनरींची क्षमता जास्त; गुंतवणूकदारांची चिंता

  • आंतराष्ट्रीय मान्यतेचे आव्हान; दुबईला टक्कर देण्याची तयारी

World News : सोन्याच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता पश्चिम आफ्रीकेतील देशांनी आता स्वतःच्या देशातूनच सोने शुद्ध करण्यावर भर दिला आहे . आतापर्यंत कच्चे सोने परदेशात पाठवून त्यावर प्रक्रिया केली जात होती .

मात्र हा व्यवसाय स्वतःच्या नियंत्रणात आणण्यासाठी घाना ,गिनी ,माली आणि बुर्किना फासो या देशांनी मोठ्या प्रमाणावर रिफायनरी उभारण्यास सुरवात केली आहे . खास बाब म्हणजे या देशांची एकत्रित शुद्धीकरण क्षमता पश्चिम आफ्रिकेतील वार्षिक सोन्याच्या उत्पादनाच्या जवळपास दुप्पट झाली आहे . त्यामुळे भविष्यातील अनेक रिफायनरींना पुरेसे सोने मिळणार का , असा प्रश्न निर्माण झाला आहे .

चार देशांनी सोन्याच्या व्यवसायावर पकड मिळवण्याची धडपड

पश्चिम आफ्रिका हा जगातील महत्वाच्या सोन्याच्या उत्पादन क्षेत्रापैकी एक आहे .पण तिथून कच्चे सोने मोठ्या प्रमाणावर दुबईसारख्या आंतराष्ट्रीय व्यापार केंद्राकडे पाठवले जाते . त्यामुळे सोन्याच्या शुद्धीकरणातून मिळणारा आर्थिक फायदा उत्पादन देशांऐवजी परदेशातील कंपन्यांना मिळतो .

ही परिस्थिती बदलण्यासाठी घाना , गिनी ,माली आणि बुर्किना फासो यांनी स्थानिक रिफायनरी प्रकल्पांना गती दिली आहे . २०२४ पासून या चार देशांमध्ये सुरु झालेल्या किंवा प्रस्तावित प्रकल्पांची एकत्रित वार्षिक क्षमता एक हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाली आहे . याउलट संपूर्ण पश्चिम आफ्रिकेतील वार्षिक सोन्याचे उत्पादन अंदाजे ५८५ टन आहे .

उत्पादन कमी , रिफायनरींची क्षमता जास्त; गुंतवणूकदारांची चिंता

सोन्याच्या उत्पादनापेक्षा शुद्धीकरण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे . अनेक रिफायनरींना पुरेशा प्रमाणात सोने उपलब्ध झाले नाही , तर त्यांचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे कठीण होऊ शकते . महत्वाचे म्हणजे घाना हा आफ्रिकेतील सर्वाधिक सोने उत्पादन करणारा देश असूनही तिथे काही रिफायनरींचा पुरेसा वापर होत नाही .

तरीही २०२७ मध्ये प्रतिवर्ष ६०० टन सोने शुद्ध करण्याची क्षमता असलेला नवीन प्रकल्प उभारण्याची योजना आहे . यामुळे गुंतवणुकीवरील परतावा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . सोन्याच्या शुद्धीकरणाचा व्यवसाय कमी नफ्याचा असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन , आधुनिक सुविधा आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रवेश महत्वाचा ठरतो .

आंतराष्ट्रीय मान्यतेचे आव्हान; दुबईला टक्कर देण्याची तयारी

स्थानिक रिफायनरी उभारणे एवढेच या देशांसमोरील आव्हान नाही . आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सोने विकण्यासाठी लंडन बुलियन मार्केट असोसिएशनची मान्यता महत्वाची मानली जाते . ही मान्यता नसल्यास मोठ्या बँका आणि आंतराष्ट्रीय व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण होऊ शकते .

गिनीमध्ये नव्या नियमांमुळे काही खाण व्यावसायिकांनी अधिकृत व्यवस्थेत आणता येईल आणि देशाच्या परकीय चलन साठ्यालाही बळ मिळेल . त्यामुळे पश्चिम आफ्रिकेची ही सोन्याची महत्वाकांक्षा प्रत्यक्षात किती यशस्वी ठरते , याकडे जागतिक बाजारपेठेचे लक्ष लागले आहे .

झोपताना डोळ्यांवर लावतात हा स्मार्ट मास्क; काय आहेत फायदे?

Sharad Pawar Retirement : पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे भडकल्या, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात

Sharad Pawar Retirement: 12 डिसेंबरला शरद पवार निवृत्त होणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया अन् चर्चेला उधाण

NCP Merger : राष्ट्रवादीचे आठही खासदार पक्ष सोडणार? शशिकांत शिंदेंनी चर्चेचं सत्य सांगितलं

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये? मनोज जरांगे थेट तुमच्या जिल्ह्यात येणार! लवकरच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा