फोटो सौजन्य: @TotalMotorcycle (X.com)
देशात बजेट फ्रेंडली बाईक्ससोबतच स्पोर्ट बाईक्सची विक्री देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त बाईकच्या किमती आणि मायलेजकडेच लक्ष द्यायचे. पण आजचा ग्राहक हा आकर्षक आणि स्पोर्ट लूक असणाऱ्या बाईकला जास्त प्राधान्य देत असतो.
यामाहा ही भारतात स्पोर्ट बाईक ऑफर करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकतेच कंपनीने त्यांची लोकप्रिय बाईक Yamaha FZ-S Fi ला भारतात नवीन अपडेट्स आणि कलर ऑप्शन्ससह लाँच केली आहे. एवढेच नाही तर त्यात नवीन OBD-2B कम्प्लायंट देखील प्रदान केले आहे. यासोबतच या बाईकमध्ये नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
कमीत कमी किती डाउन पेमेंट केल्यास Range Rover Velar होईल तुमची? असा असेल EMI चा हिशोब
नवीन Yamaha FZ-S Fi भारतीय मार्केटमध्ये 1,34,800 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. मागील जनरेशनमधील Yamaha FZ-S Fi V4 DLX पेक्षा ही बाईक 3000 रुपये महाग आहे आणि Yamaha FZ-S Fi हायब्रिड पेक्षा 10000 रुपये स्वस्त आहे. ही बाईक भारतातील बजाज पल्सर N150 आणि TVS Apache RTR 160 2V सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
नवीन Yamaha FZ-S Fi चे डिझाइन पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे, परंतु त्यात चार नवीन कलर ऑप्शन्स देखील देण्यात आले आहेत, जे मेटॅलिक ग्रे, मॅट ब्लॅक, आइस फ्लुओ-व्हर्मिलियन आणि सायबर ग्रीन आहेत. हे कलर्स बाईकला एक वेगळाच स्पोर्टी लूक देतात.
यामाहाच्या या नवीन बाईकमध्ये नवीन OBD-2B कम्प्लायंट 149cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे. हे इंजिन 12.5 पीएस पॉवर आणि 13.3 एनएम टॉर्क जनरेट करते. परफॉर्मन्सच्या बाबतीत ही बाईक यामाहा एफझेड-एस एफआय हायब्रिडसारखीच आहे.
यामाहाने आपल्या नव्या बाईकमध्ये कनेक्टिव्हिटी फिचर्सवर विशेष भर दिला आहे. या बाईकमध्ये निगेटिव्ह एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Yamaha Y-Connect मोबाईल अॅपशी कनेक्ट करता येतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉल, एसएमएस आणि ईमेल अलर्ट्स, फोनची बॅटरी कंडिशन, फ्युएल कंजम्पशन ट्रॅकर तसेच पार्किंग लोकेशन यासारखी माहिती थेट बाईकच्या स्क्रीनवर पाहता येते.
तसंच, यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे. काही जणांना 150 सीसी बाईकसाठी हे फीचर अनावश्यक वाटू शकते, मात्र नवीन रायडर्ससाठी हे एक महत्त्वाचे सेफ्टी फिचर ठरू शकते.
या बाईकमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. तसेच यामध्ये 17-इंचांचे अलॉय व्हील्स असून, ब्रेकिंगसाठी 282 मिमी फ्रंट डिस्क आणि 220 मिमी रिअर डिस्क ब्रेक्स वापरण्यात आले आहेत. हे ब्रेक्स सिंगल-चॅनेल ABS सिस्टमसह सुसज्ज आहेत, जे अधिक सुरक्षित ब्रेकिंग एक्सपीरियन्स देतात.