आपल्या पत्नीच्या अपघातानंतर Sonu Sood ने सांगितली 'ही' महत्वाची गोष्ट, नितीन गडकरींची सुद्धा मिळाली साथ
हल्ली ज्याप्रमाणे कार्सची विक्री ही झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे अपघातांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदच्या पत्नीच्या अपघाताची घटना समोर आली होती. हा अपघात महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा मार्च 2025 मध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. दोन आठवड्यांनंतर, या घटनेवर अभिनेता सोनू सूदने आपले मौन सोडले आहे. सोनू सूदच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. काय आहे ही पोस्ट आणि काय म्हणतोय सोनू सूद? चला जाणून घेऊया.
कमीत कमी किती डाउन पेमेंट केल्यास Range Rover Velar होईल तुमची? असा असेल EMI चा हिशोब
Seat belt nahin..To aapka parivaar nahin !!!
Wear seat belts even if you are sitting in the rear seat🙏 pic.twitter.com/keiK6S0Irl— sonu sood (@SonuSood) April 7, 2025
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या पत्नीसोबत झालेल्या अपघाताच्या काही आठवड्यांनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने रोड सेफ्टीबद्दल मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये एक मोठा अपघात झाला ज्यामध्ये त्याची पत्नी, त्याची बहीण आणि पुतणे कारमध्ये होते. कारची अवस्था कशी होती हे संपूर्ण जगाने पाहिले. त्याचे कुटुंब वाचले असेल तर ते सीट बेल्टमुळेच. विशेषतः मागे बसणारे लोक सीट बेल्ट लावत नाहीत.
सोनू सूद म्हणाला की, माझी पत्नी सोनालीने सुनीताला सीट बेल्ट लावण्यास सांगितले आणि सीट बेल्ट लावल्यानंतर अवघ्या एका मिनिटातच हा अपघात झाला. तिघेही सुरक्षित होते कारण त्यांनी सीट बेल्ट लावले होते. तो पुढे म्हणतो की, 100 पैकी 99 लोक मागच्या सीटवर बसताना सीट बेल्ट लावत नाहीत, त्यांना वाटते की हे समोर बसलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की सीट बेल्ट न लावता कधीही कारमध्ये बसू नका. बहुतेक ड्रायव्हर फक्त पोलिसांना दाखवण्यासाठी सीट बेल्ट लावतात, पण माझ्यावर विश्वास ठेवा सीट बेल्ट तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करते.
Maruti च्या ‘या’ SUV वर अनोखी डिस्काउंट, शोरूममध्ये जावा आणि 1 लाख रुपयाचे कॅश डिस्काउंट मिळवा
रोड सेफ्टीबद्दल जागरूकता पसरवणाऱ्या सोनू सूदच्या व्हिडिओला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेही समर्थन मिळाले आहे. सोनू सूदच्या व्हिडिओवर भाष्य करताना केंद्रीय मंत्र्यांनी लिहिले की प्रत्येक जागा महत्त्वाची आहे, प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. मागच्या सीट बेल्टमुळे जीव वाचतात. तुमच्या प्रियजनांसाठी सीट बेल्ट लावा !