फोटो सौजन्य: iStock
देशभरासह जगभरात किया मोटर्सचे नाव आपल्या दमदार आणि उत्तम परफॉर्मन्स असणाऱ्या कारसाठी लोकप्रिय आहे. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार चांगल्या कार्स ऑफर केल्या आहेत. नुकतेच दक्षिण कोरियात एक कार्यक्रम झाला, ज्यात किया मोटर्सने आपल्या भविष्यातील कामगिरीबद्दल भाष्य केले आहे.
अलीकडेच दक्षिण कोरियामध्ये CEO Investor Day चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, कियाने त्यांची नवीन आणि अपडेटेड ‘Plan S Strategy’ सादर केली. हा प्लॅन कंपनीची मिड ते लॉंग टर्म बिजनेस स्ट्रॅटर्जी आणि फायनान्शियल टार्गेट दर्शवते. याद्वारे, कंपनी 2030 पर्यंत 41.9 लाख जागतिक युनिट्स विकण्याचे उद्दिष्ट ठेवते, ज्यामध्ये 23.3 लाख युनिट्स इलेक्ट्रिफाइड व्हेईकल (ईव्ही आणि हायब्रिड) समाविष्ट असतील.
अखेर ग्राहकांना समजली ‘या’ कंपनीची खरी किंमत ! 17 वर्षात पहिल्यांदाच अनुभवली रेकॉर्डब्रेक विक्री
कियाने 2030 पर्यंत आपले ग्लोबल प्रोडक्शन 17% वाढवून 42.5 लाख युनिट्सपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कंपनी आपल्या प्रोडक्शन लाइनअपमध्ये EV2, EV3, EV4 आणि EV5 यांसारख्या इलेक्ट्रिक मॉडेल्सचा समावेश करत आहे. याव्यतिरिक्त, किया PBV (प्लॅटफॉर्म बियॉन्ड व्हेईकल) आणि पिकअप ट्रकसारख्या नव्या सेगमेंटमध्येही आपली उपस्थिती वाढवत आहे.
CEO Investor Day च्या वेळी, कंपनीने B2B (बिझनेस-टू-बिझनेस) क्षेत्रातील आपला फोकसही स्पष्ट केला. कंपनीने जाहीर केले की 2030 पर्यंत 2.5 लाख पीबीव्ही युनिट्स विकण्याचा मानस आहे. याची सुरुवात PV5 या मॉडेलपासून होईल, ज्यामध्ये पुढे 2027 मध्ये PV7 आणि 2029 मध्ये PV9 हे मॉडेल्स सादर केले जातील. याचबरोबर, किया अमेरिकन बाजारातही आपला इलेक्ट्रिक पिकअप सादर करण्याच्या तयारीत आहे.
कियाच्या या लॉंग टर्ममध्ये भारतीय बाजारपेठेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. किया इंडिया 2030 पर्यंत एकूण वाहन विक्रीपैकी 43% इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड वाहनांची विक्री साध्य करण्याचे टार्गेट ठेवत आहे. याचा अर्थ, दर 100 कार्सपैकी 43 कार्स पूर्णपणे इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड असतील.
तसेच, कंपनीने 2030 पर्यंत नुकतीच लाँच केलेली Kia Syros चे 4 लाख युनिट्स विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच या मॉडेलची इलेक्ट्रिफाइड व्हर्जन सादर होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. याव्यतिरिक्त, किया सध्या एका नव्या प्रीमियम MPV वर काम करत आहे, जी ICE (पेट्रोल/डिझेल) आणि EV अशा दोन्ही पॉवरट्रेनमध्ये बाजारात सादर केली जाईल.
कंपनीने पुष्टी केली आहे की Seltos आणि Telluride सारखे लोकप्रिय मॉडेल भारतात हायब्रिड पॉवरट्रेनसह लाँच केले जातील.