फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या जातात. यातही सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात. आता मार्केटमध्ये Mahindra BE, 6 XEV 9e आणि Tesla Model Y सारख्या इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील ऑफर होत आहे.
नुकतेच July 2025 मध्ये काही एसयूव्हींनी विक्रीत बाजी मारली आहे. ह्युंदाई क्रेटा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे, तर महिंद्रा थार आणि मारुती सुझुकी फ्रॉन्क्स सारख्या एसयूव्हीची विक्रीही वाढली आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप एसयूव्हींबद्दल आज आपण जाणून घेऊया.
जुलै २०२५ मध्ये ह्युंदाई क्रेटा पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. या कारचे 16,898 नवीन खरेदीदार मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत 3% ची थोडीशी घट झाली असली तरी, या कारची मागणी अजूनही जास्त आहे. ही एसयूव्ही फक्त 11.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे आणि त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 6 एअरबॅग्ज सारखी प्रीमियम फीचर्स आहेत. तसेच, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा सारख्या सेफ्टी टेक्नॉलॉजीमुळे ही कार अधिक खास बनते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, याचे फ्युएल इकॉनॉमी 21.8 किमी प्रति लिटर आहे.
या यादीत मारुतीची ब्रेझा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै 2025 मध्ये या कारचे 14,065 युनिट्स विकले गेले आहे. गेल्या वर्षी जुलैच्या तुलनेत यात 4% घट झाली असली तरी, परवडणारी किंमत आणि मायलेजमुळे ती अजूनही लोकांची आवडती आहे.
या महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओने जबरदस्त कमबॅक केले आहे. जुलै 2025 मध्ये 13,747 युनिट्स विकल्या गेल्या, जे गेल्या वर्षीपेक्षा 12% जास्त आहे. ही एसयूव्ही त्याच्या बोल्ड लूक आणि ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाते आणि अजूनही भारतातील सर्वात जास्त पसंत केलेल्या पॉवरफुल एसयूव्हींपैकी एक आहे.
Harley-Davidson च्या ‘या’ 2 बाईकवर तब्बल 3 लाख रुपयांची सूट, लूक आणि डिझाइनमध्ये सगळ्यांमध्ये खास
मारुतीच्या फ्रॉन्क्सला जुलैमध्येही मोठे यश मिळाले. या कारचे एकूण 12,872 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत तिच्या विक्रीत 18% वाढ झाली आहे, जे दर्शवते की ही एसयूव्ही तरुणांमध्ये आणि शहरवासीयांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
जुलै 2025 मध्ये टाटा नेक्सॉनला 12,825 युनिट्सची विक्री झाली. हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा 8% कमी आहे, परंतु तरीही ही एसयूव्ही तिच्या 5-स्टार सेफ्टी रेटिंग, पॉवरफुल इंजिन आणि डिझाइनसाठी ओळखली जाते.