'या' व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate
भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेकांचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे आलिशान कार असावी. मात्र, अनेकांना लक्झरी कारसोबतच महागड्या नंबर प्लेट खरेदी करण्याचा देखील छंद असतो. खरंतर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योजकांकडे महागड्या कार आणि त्यासोबतच VIP नंबर प्लेट असतात. या VIP नंबर प्लेटसाठी सुद्धा लाखो रुपये मोजावे लागतात.
आलिशान आणि लक्झरी कार्ससोबतच त्यांची VIP नंबर प्लेट सुद्धा कार मालकाची प्रतिष्ठा वाढवत असते. महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान आणि मुकेश अंबानी सारख्या सेलिब्रिटींच्या कार्सच्या खास नंबर प्लेटबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की या स्टार्सकडे देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट नाही? देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट मिळवण्याचा मान हा केरळमधील एका टेक कंपनीच्यासीईओ वेणू गोपालकृष्णन यांचा आहे.
15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI
लिटमस7 (Litmus7) कंपनीचे सीईओ वेणू गोपालकृष्णन यांनी अलीकडेच त्यांच्या कार कलेक्शनमध्ये एक नवीन लक्झरी एसयूव्हीचा समावेश केला आहे. त्यांनी तब्बल 4.2 कोटी रुपये किमतीची Mercedes-Benz G63 AMG खरेदी केली आहे. मात्र, कारपेक्षा कारच्या नंबर प्लेटचीच जास्त चर्चा आहे. त्यांच्या कारचा रजिस्ट्रेशन नंबर KL 07 DG 0007 आहे. वेणूने या अनोख्या नंबरसाठी तब्बल 47 लाख रुपये दिले आहेत, जो आतापर्यंत देशातील सर्वात महागडा नंबर प्लेट मानला जातो.
या एसयूव्हीला खास बनवण्यासाठी, वेणू गोपालकृष्णन यांनी सॅटिन मिलिटरी ग्रीन रंग निवडला आहे, जो तिला एक रॉयल आणि पॉवरफुल लूक देतो. यात ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स आणि प्रीमियम लेदर फिनिश इंटिरिअर आहे. त्यांनी मागील प्रवाशांसाठी ड्युअल स्क्रीन सीट एंटरटेनमेंट पॅकेज देखील बसवले आहे. या कारमध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन आहे, जे 585 बीएचपी पॉवर आणि 850 एनएम टॉर्क जनरेट करते. हे 9-स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते, जे ते स्पीड आणि स्मूथ ड्रायव्हिंग दोन्हीचे उत्तम कॉम्बिनेशन बनवते.
Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
भारतात नेहमीच व्हीआयपी नंबर प्लेट्सची क्रेझ राहिली आहे, परंतु 47 लाख रुपयांना खरेदी केलेली ही नंबर प्लेट आजपर्यंतची सर्वात महाग नंबर प्लेट ठरली आहे. सहसा लोक त्यांच्या पसंतीचा नंबर मिळविण्यासाठी काही हजार किंवा लाखो रुपये खर्च करतात, परंतु KL 07 DG 0007 निवडून, वेणू गोपालकृष्णन यांनी ती देशातील सर्वात खास नंबर प्लेट बनवली आहे.