फोेटो सौजन्य: iStock
मार्केटमध्ये आता पेट्रोल किंवा डिझेल नाही तर इलेक्ट्रिक कार्सला चांगली मागणी मिळत आहे. ग्राहक देखील इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, या इलेक्ट्रिक कार फक्त फीचर्सच्या बाबतीत पुढे नाही तर स्पीडच्या बाबतीत देखील सुपर-फास्ट आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत, 7 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठणे, हे लक्झरी सेडान किंवा हाय-एंड एसयूव्हीचे स्वप्न होते. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. भारतातील तीन सर्वात वेगवान कार आता इलेक्ट्रिक आहेत, त्याही मेड-इन-इंडिया आणि सामान्य खरेदीदारांच्या बजेटमध्ये.
या तीन कार म्हणजे टाटा हॅरियर ईव्ही, महिंद्रा BE 6 आणि महिंद्रा एक्सयूव्ही 9E. या मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही आहेत, ज्या फक्त 6.3 ते 6.7 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठतात. त्यांची सुरुवातीची किंमत 18.90 लाखांपासून सुरू होते, जी 30.50 लाखांपर्यंत जाते. भारतीय ऑटो उद्योगात या तीन ईव्ही कार कशा प्रकारे आपली छाप पाडत आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
ही कार 3 जून 2025 रोजी लाँच करण्यात आली होती. याच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही ईव्ही फक्त 6.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेण्यास सक्षम आहे. तिची किंमत 21.49 लाख रुपये ते 27.05 लाख रुपये आहे. यात 65 kWh आणि 75 किलोवॅट प्रति तास बॅटरी पर्याय आहे. या कारची रेंज 627 किमी आहे.
ही आतापर्यंतची सर्वात वेगवान टाटा कार आहे. हॅरियर ईव्ही टाटाच्या जेन-2 ईव्ही आर्किटेक्चरवर बनवली आहे, जी ड्युअल मोटर आणि ऑल-व्हील ड्राइव्हला सपोर्ट करते.
2025 च्या सुरुवातीला महिंद्रा XUV 9e लाँच करण्यात आली होती. ही EV 6.7 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेण्यास सक्षम आहे. याची किंमत 21.90 लाख रुपये ते 30.50 लाख रुपये आहे. यात 59 kWh आणि 79 kWh चा बॅटरी पर्याय आहे. या कारची रेंज 542 किमी ते 656 किमी आहे.
सरकार, कंपनी की डीलर, एक कार किंवा बाईक खरेदी केल्यास कोणच्या खिशात जातात जास्त पैसे?
XUV 9e ही महिंद्राच्या नवीन INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जी कूपसारखी डिझाइन आणि ड्युअल मोटर परफॉर्मन्स देते. यात स्पोर्टी लूक, तंत्रज्ञानाने समृद्ध केबिन आणि जलद चार्जिंग फिचर आहे. ही कार देखील बरीच वेगवान आहे.
ही कार देखील 2025 च्या सुरुवातीला लाँच करण्यात आली. ही ईव्ही 6.7 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेऊ शकते. याची किंमत 18.90 ते 26.90 लाख रुपये आहे. यात 59 किलोवॅट प्रति तास आणि 79 किलोवॅट प्रति तास बॅटरी पर्याय आहे. या कारची रेंज 557 किमी ते 683 किमी पर्यंत आहे.