फोटो सौजन्य: @zoya_offcl(X.com)
भारतातील ऑटोमोबाईलमधील वातावरण इलेक्ट्रिक वाहनासाठी आता अनुकूल बनत आहे. याचे उत्तम उदाहरण आजचा ग्राहक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे जास्त प्राधान्य देत आहे. तसेच सरकार देखील चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त लक्षकेंद्रित करत आहे. यामुळे दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन पर्याय सादर करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्हीएस भारतीय बाजारात TVS Jupiter Electric देखील लाँच करू शकते. स्कूटरच्या लाँचिंगबाबत कोणती माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
सरकार, कंपनी की डीलर, एक कार किंवा बाईक खरेदी केल्यास कोणच्या खिशात जातात जास्त पैसे?
भारतीय बाजारात TVS ज्युपिटर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू शकते का? हा प्रश्न आता विचारला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू शकते. मात्र, याबद्दल TVS कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अहवालांनुसार, काही वैशिष्ट्यांमुळे TVS ज्युपिटर इलेक्ट्रिक लाँच केली जाऊ शकते. सध्याची ज्युपिटर इंजिनसह देण्यात आली आहे. ही कंपनीची सर्वात पसंतीची स्कूटर आहे. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक पर्याय आणून कंपनी ज्युपिटर नावाचा फायदा घेऊ शकते. याशिवाय, सध्याची ICE ज्युपिटरचा प्लॅटफॉर्म EV साठी आधीच तयार आहे. कारण यामध्ये पेट्रोल टँक अंडरफ्लोअर दिलेला आहे. जिथे EV ची बॅटरी सहजपणे बसवता येते. यामुळे बूट स्पेस देखील कमी होणार नाही.
रिपोर्ट्सनुसार, टीव्हीएस ज्युपिटर इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम सेगमेंटऐवजी कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये लाँच केली जाऊ शकते. यामुळे कमी बजेट असलेल्या लोकांना एक चांगली इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होईल.
या आगामी आठवड्यात Suzuki E Access होऊ शकते लाँच, Honda Activa E ला मिळणार जोरदार टक्कर
टीव्हीएसने याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील काही महिन्यांत टीव्हीएस ज्युपिटर इलेक्ट्रिक भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते.
जर टीव्हीएसने ज्युपिटर इलेक्ट्रिक लाँच केली तर ती Ola, Ather, Bajaj सारख्या प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांना जोरदार स्पर्धा देऊ शकते. याशिवाय, ही स्कूटर इतर अनेक स्टार्टअप्सना देखील आव्हान देईल.