फोटो सौजन्य: @AR12Gaming/ X.com
नुकतेच कंपनी Honda Civic Type R ची भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करत आहे. होंडा अनेक देशांमध्ये सिविक टाइप आर ऑफर करते आणि ती कंपनीच्या सर्वात स्पोर्टी कारपैकी एक मानली जाते. अलिकडच्या अहवालांनुसार ही कार भारतीय रस्त्यांवर स्पॉट झाली आहे. त्यानंतर, असे मानले जाते की होंडा भारतातही ही कार लाँच करण्याची तयारी करत आहे. मात्र, कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Royal Enfield Classic 350 विरुद्ध Harley-Davidson X440 T, कोणती बाईक सरस? जाणून घ्या
Honda Civic Type R मध्ये 2.0-लीटर चे पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन टर्बोचार्जसह येते, ज्यामुळे कारला 315 हॉर्सपावर आणि 310 Nm टॉर्क मिळतो. इतक्या पॉवरफुल आउटपुटमुळे Civic Type R अतिशय जलद आणि स्पोर्टी ड्राईव्ह देते. हे इंजिन Honda च्या आतापर्यंतच्या सर्वात दमदार VTEC Turbo इंजिनपैकी एक मानले जात आहे. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.
या कारमध्ये स्पोर्टी डिझाइनसोबत प्रीमियम फीचर्सचा भरगोस सेट दिला जाऊ शकतो. यात 19-इंच अलॉय व्हील्स, LED लाइट्स, मोठा रिअर स्पॉयलर, ब्लॅक फ्रंट ग्रिल आणि ट्रिपल एग्झॉस्ट मिळू शकतात. इंटीरियरमध्ये लाल आणि काळ्या रंगाची स्पोर्टी थीम दिली जाऊ शकते. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.2-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन, Bose चे 12 स्पीकर, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay मिळू शकते. सुरक्षेसाठी ADAS, ABS, EBD आणि पार्किंग सेन्सर सारखी फीचर्सही दिली जातील, ज्यामुळे ही कार सुरक्षित आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण वाटते.
नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित
Honda ने भारतात Civic Type R च्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार कंपनी ही कार CBU (म्हणजे थेट परदेशातून इंपोर्ट) मॉडेल म्हणून 2026 मध्ये भारतात आणू शकते. असे झाले, तर ही कार मर्यादित संख्येतच विक्रीसाठी उपलब्ध असेल.
जर Civic Type R भारतात लाँच झाली, तर याची स्पर्धा थेट Skoda Octavia RS आणि Volkswagen Golf GTI सारख्या हाय-परफॉर्मन्स कार्सशी होऊ शकतो.






