फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर झाल्या आहेत. यातील काही कार्स जसे आल्या तसे गेल्या सुद्धा. पण आजही काही कार अशा आहेत, ज्यांची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. यातीलच एक कार वॅगन आर.
भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासाची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने 2024-25 या आर्थिक वर्षाचा शेवट एका दमदार विक्रमासह केला आहे. कंपनीने मार्चमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे, ज्यामध्ये एकूण 22,34,266 वाहने आहेत. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये मारुतीने 21,35,323 वाहने विकली होती. या विक्रीसह, कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक WagonR 2022 पासून सलग चौथ्यांदा भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब जिंकला आहे.
ग्राहकांची ‘या’ कंपनीच्या टू-व्हिलर्सला भरभरून मागणी, तब्बल 12.56 लाख बाईक्सची रेकॉर्डब्रेक विक्री
तसेच वॅगनआरने टाटा पंचला मागे टाकत विक्रीच्या बाबतीत पहिले स्थान पटकावले आहे. जरी टाटा पंच ही कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होती, तरी आर्थिक वर्षाच्या आकडेवारीत वॅगनआरने तिला मागे टाकले.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने आर्थिक वर्ष 24-25 मध्ये वॅगनआर ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून घोषित केली आहे. या वर्षी वॅगनआरच्या 1,98,451 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती सुझुकी वॅगनआरने सलग चौथ्या वर्षी 33.7 लाख ग्राहकांसह भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा विक्रम कायम ठेवला आहे.
मारुती सुझुकीने केवळ आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक विक्री नोंदवली नाही तर देशांतर्गत आणि एक्स्पोर्ट मार्केटमध्येही कंपनी आघाडीवर राहिली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात 17,95,259 युनिट्सची विक्री केली आणि 3,32,585 युनिट्सची निर्यात केली. त्याच वेळी, कंपनीच्या महिन्या-दर-महिना विक्रीत घट दिसून आली आहे. मार्च 2025 मध्ये देशांतर्गत विक्री 1,60,016 युनिट्स होती, जी मार्च 2024 मध्ये 1,61,304 युनिट्स होती.
ऑटोमोबाईल उद्योग विश्लेषक आणि उत्पादकांना 2025 -26 या आर्थिक वर्षात वाहन विक्रीत 1-2% ने किंचित वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि सेल्स) पार्थो बॅनर्जी म्हणाले, “आम्हालाही अशाच प्रकारची वाढ अपेक्षित आहे.” 2025 -26 या आर्थिक वर्षात १-२% वाढ अपेक्षित आहे.
मारुती सुझुकीने मार्च 2025 च्या अखेरीस त्यांच्या सर्व कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे, परंतु कंपनीने अद्याप त्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. कंपनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे, जी कारच्या मॉडेलनुसार बदलू शकते.