फोटो सौजन्य: YouTube
जागतिक ऑटोमोबाइल क्षेत्रात नेहमीच अनेक दमदार कार्स लाँच होत असतात. काही कंपनीज पूर्णपणे नव्याने बनवलेली कार जागतिक मार्केटमध्ये आणत असतात तर काही आपल्या जुन्या कार्सचे अपडेटेड व्हर्जन आणत असतात.
बीवायडी हे एक चायनीज कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या दमदार आणि स्टायलिश लूक असणाऱ्या कार्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच कंपनीने त्याच्या इलेक्ट्रिक सेडान सीलचे नवीन व्हर्जन सादर केले आहे. BYD ने जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या बाबतीत अनेक ICE ब्रँड्स मागे टाकले आहेत. ही कार बाजारात टेस्लाच्या मॉडेल 3 शी स्पर्धा करते. या कारच्या दोन व्हर्जन्स आहेत ज्या सिंगल आणि ड्युअल मोटरसह येतात.
हे देखील वाचा:July 2024 ठरला बाईक उत्पादक कंपनीजसाठी सुवर्ण महिना, विकल्या गेल्या 6.84 लाख बाईक्स
या कारच्या टॉप-एंड परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की ही कार 3.8 सेकंदात 0-10 किमी/ताशी वेग पकडते. या कारमध्ये तुम्हाला 82.5kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो जो 400-450 किमी अंतर सहज पार करू शकतो तर या कारची अधिकृत रेंज 580 किमी आहे. जेव्हा या कारची बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा 200 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 15 मिनिटांचे चार्जिंग आवश्यक असते.
या नवीन कारमध्ये अपग्रेडेड चेसिस ऑप्टिमल सस्पेंशन परफॉर्मेंस मिळते. हे कम्फर्ट, स्टॅबिलिटी, हँडलिंग आणि सस्पेंशन सेटअप सुधारते.
हे देखील वाचा: टाटाची सर्वात जास्त विकली जाणारी ‘ही’ कार झाली टॅक्स फ्री, आजच करा बुक
टॉप-स्पेक AWD व्हेरियंटमध्ये प्रगत डॅम्पिंग कंट्रोल सिस्टम देखील मिळते. नवीन कारमध्ये एक अपडेटेड इंटीरियर आहे, ज्यामध्ये एक अनोखे चार-स्पोक फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील आणि एक मोठी सेंट्रली माउंटेड फ्लोटिंग टचस्क्रीन आहे. यात रोटेशन फंक्शन आहे. तसेच या कारमध्ये मिनिमलिस्ट सेंटर कन्सोल, वायरलेस चार्जिंग पॅड आणि हिडन एसी व्हेंट्स, W-HUD हेड अप डिस्प्ले आणि 13 एअरबॅग्स समाविष्ट आहेत.