Donald Trump यांनी भारतीय ऑटो कंपन्यांचे वाढवले टेन्शन ! नेमकं कारण काय? जाणून घ्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहेमीच आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. आता ट्रम्प यांनी वाहन निर्यातीवर 25 टक्के टॅक्स लादण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नक्कीच ऑटो कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर ऑटो कंपोनंट उत्पादकांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयाचा भारतीय ऑटो कंपोनंट उद्योगावर मोठा परिणाम होईल असे वर्तविले आहे. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अखेर Royal Enfield Classic 650 झाली लाँच ! एप्रिल 2025 पासून सुरु होणार डिलिव्हरी, किंमत फक्त
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा केली की एप्रिलपासून ऑटो इंपोर्टसवर 25 टक्के टॅक्स लादला जाणार आहे. याअंतर्गत, इंजिन, ट्रान्समिशन, पॉवरट्रेन पार्ट्स आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट्ससारख्या ऑटोमोटिव्ह पार्ट्सवरही 25 टक्के टॅरिफ आकारले जाईल. या टॅरिफचा भारतीय ऑटो कंपोनंट उत्पादकांवर मोठा परिणाम होऊ शकतो, कारण भारतातून अमेरिकेत ऑटो कंपोनंटची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.
अमेरिकेने ऑटो इंपोर्टसवर 25 टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयामुळे ऑटो कंपोनंट्सच्या निर्यातीवर होणारा परिणाम भारतीय ऑटोमोबाईल उत्पादकांवर कमी होईल. खरंतर, अलिकडच्या काळात, पूर्णपणे निर्मित कार्स भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जात नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय वाहन उत्पादकांपेक्षा या टॅरिफमुळे ऑटो कंपोनंट्स उत्पादकांना जास्त नुकसान होऊ शकते.
अमेरिकेच्या वाढीव टॅरिफ प्लॅनचा परिणाम भारतातील अग्रगण्य ऑटो कंपनी टाटा मोटर्सवर होऊ शकतो, परंतु कंपनीची अमेरिकेत थेट निर्यात नाही. त्यांची उपकंपनी जग्वार लँड रोव्हरचे अमेरिकन बाजारपेठेत चांगली पकड आहे. JLR च्या आर्थिक वर्ष 24 च्या वार्षिक अहवालानुसार, अमेरिकेतील विक्रीत कंपनीचा एकूण वाट 22 टक्के होता. कंपनीने जगभरात सुमारे 400,000 वाहने विकली आहेत, ज्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक वाहने विकली गेली आहेत.
तसेच, या निर्णयाचा परिणाम रॉयल एनफील्ड बाईक्स बनवणारी कंपनी आयशर मोटर्सवर सुद्धा दिसून येईल, कारण कंपनीची ६५० सीसी मॉडेल बाईक अमेरिकेत विकली जाते.
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडवरही या निर्णयाचा परिणाम होईल. ही कंपनी ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन करते आणि ते अमेरिकेतही पोहोचवते, जसे की वायरिंग हार्नेस, प्लास्टिक घटक आणि रिअर व्ह्यू मिरर.
हा नवीन टॅरिफ 2 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. तसेच, त्याची वसुली देखील दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 3 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. तज्ञांच्या मते, ट्रम्पच्या या निर्णयामुळे अमेरिकन ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो.