फोटो सौजन्य: iStock
दारू पिणे हे वाईट जरी असले तरी कित्येक जण नशा चढावी म्हणून ती पित असतात. दारू प्यायल्यानंतर कित्येक जण नशेत धुंद होऊन काहीही करत असतात. यामुळे फक्त त्यांच्याच नाही तर इतरांचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे, जिथे चक्क एका नशेत धुंद असणाऱ्या व्यक्तीने आपली कार रेल्वे ट्रॅकवर आणली होती. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. चला जाणून घेऊया, नेमके घडले काय?
कर्नाटकातील टेकल रेल्वे स्थानकावर एका दारू प्यायलेल्या व्यक्तीने आपली कार रेल्वे स्थानकाच्या आवारात घुसवल्याची धक्कादायक घटना घडली. तो माणूस इथेच थांबला नाही तर त्याने आपली कार प्लॅटफॉर्मवर घेऊन गेला आणि नंतर ती रेल्वे ट्रॅकवर नेली.
Hyundai ची ‘ही’ एसयूव्ही महागली, जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटला खरेदी करणे झाले महाग
दिलासा देणारी बाब म्हणजे ज्या वेळी कार रेल्वे रुळावर आली, त्या वेळी रेल्वे सेवा सुरू नव्हत्या. यामुळे फारसे नुकसान झालेले नाही. क्रेनच्या मदतीने कार रुळावरून बाहेर काढण्यात आली. राकेश नावाचा एक माणूस त्याच्या मारुती स्विफ्ट डिझायरमध्ये होता आणि त्याने इतकी दारू प्यायली होती की तो बेशुद्ध पडला होता, असे सांगण्यात येत आहे.
दारू प्यायल्यामुळे त्याने कारचा तोल गमावला आणि ती पायऱ्यांवरून खाली उतरून थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचली. यानंतर त्यांची मारुती स्विफ्ट डिझायर रेल्वे ट्रॅकवर अडकली. ही घटना घडताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा जमाव घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
तरुणांची धडकन असणारी Harley-Davidson बाईक्सची किंमत स्वस्त होणार, Budget 2025 मध्ये मोठी घोषणा
रेल्वे प्रशासनाला याची माहिती मिळताच, तात्काळ जेसीबी बुलडोझर बोलावण्यात आला आणि कार रेल्वे ट्रॅकवरून हटवण्यात आली. यादरम्यान, कारच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. यासोबतच पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी राकेशची वैद्यकीय चाचणी केली तेव्हा तो मद्यधुंद असल्याचे समोर आले. त्याची स्थिती खूपच गंभीर होती, कारण तो रेल्वे ट्रॅकवर घातक अवस्थेत होता. मोठी गोष्ट म्हणजे, त्यावेळी ट्रॅकवर कोणतीही ट्रेन येणार नव्हती. त्यामुळे एक मोठा अपघात टळला, ज्यामुळे अनेक जणांचा जीव वाचला.