बजेट प्लॅन असा ज्यामुळे काही मिनिटातच Tata Safari होईल तुमच्या नावावर
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न. हेच स्वप्न अनेक जण Diwali 2025 मध्ये पूर्ण करत असतात. आपली स्वतःची कार खरेदी करताना भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक कार पाहायला मिळतात. यातही ग्राहक कार खरेदी करताना सर्वात जास्त प्राधान्य Tata Motors च्या कार्सना देत असतात.
भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. टाटा सफारी ही कंपनीची लोकप्रिय कार. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती घरी आणण्यासाठी 5 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्ही दरमहा किती ईएमआय भरावा लागू शकतो? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
TVS Jupiter 110 vs Jupiter 125: दोन्ही स्कूटर तुमच्यासाठी ठरेल एकदम बेस्ट?
राजधानी दिल्लीमध्ये, सफारीच्या बेस व्हेरिएंटची किंमत अंदाजे 14.66 लाख (एक्स-शोरूम) असेल. 14.66 लाख (एक्स-शोरूम) व्यतिरिक्त, तुम्हाला अंदाजे 1.83 लाख (आरटीओ) आणि अंदाजे 86000 (विमा कर) द्यावे लागतील. 14662 रुपयांचा टीसीएस शुल्क देखील जोडला जाईल. यामुळे एसयूव्हीची ऑन-रोड किंमत 17.50 लाख रुपये होईल.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून तुम्हाला केवळ एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला सुमारे पाच लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागतील आणि उर्वरित 12.50 लाख रुपयांचे कर्ज बँकेमार्फत घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 12.50 लाख रुपये कर्ज देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दर महिन्याला फक्त 20,111 रुपयांचा इतकी EMI भरावा लागेल.
Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 गाड्यांचा नक्की विचार करा
जर तुम्ही 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 12.50 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर त्या कालावधीत तुम्हाला दरमहा 20,111 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशाप्रकारे सात वर्षांत तुम्ही सुमारे ₹4.39 लाख रुपये केवळ व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून कारची एकूण किंमत सुमारे 21.89 लाख रुपये इतकी होईल.
टाटा मोटर्सची Safari ही सात आसनी SUV सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे आणि ती अनेक प्रीमियम व सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे. या कारचा थेट मुकाबला JSW MG Hector Plus, Mahindra Scorpio N, आणि Mahindra XUV700 सारख्या लोकप्रिय SUV मॉडेल्सशी होतो.