TVS Jupiter 110 vs Jupiter 125: कोणती स्कूटर तुमच्यासाठी ठरेल एकदम बेस्ट?
भारतीय दुचाकी विभागात अनेक बाईक आणि स्कूटर ऑफर होत असतात. यातही सर्वाधिक मागणी ही स्कूटरला असते. याचे कारण म्हणजे बाईकच्या तुलनेत स्कूटर चालवण्यास सोपी आणि सोयीस्कर असते. यातही अनेक जण मार्केटमध्ये स्कूटर म्हणून TVS Jupiter खरेदी करत असतात. यातही TVS Jupiter 110 आणि Jupiter 125 कंपनीचे लोकप्रिय स्कूटर आहेत. अनेकदा ग्राहक या दोन्ही ऑप्शन्समध्ये कोणता स्कूटर निवडावा याबाबत गोंधळात असतात. चला या दोन्ही स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.
TVS Jupiter 110 चे डिझाइन साधे आहे. त्यात जास्त क्रोम एलिमेंट्स नाहीत, फक्त Jupiter आणि TVS बॅजिंग साइड पॅनल्सवर आढळते. ते तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते, जे Meteor Red Gloss, Titanium Grey Matte आणि Lunar White Gloss आहेत. लाल रंग त्याला थोडा स्पोर्टी लूक देतो.
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Toyota Hyryder ची चावी डायरेक्ट तुमच्या खिश्यात! EMI फक्त…
TVS Jupiter 125 चे डिझाइन अधिक कर्वी आहे आणि प्रीमियम फील देते. यात हेडलाइट काऊल, एप्रन आणि साइड पॅनल्सवर क्रोम गार्निशिंग आहे. ते इंडी ब्लू, टायटॅनियम ग्रे आणि व्हाईट रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यापैकी, इंडी ब्लू सर्वात आकर्षक दिसते.
TVS Jupiter 110 मध्ये 113cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 8PS पॉवर आणि 9.2Nm टॉर्क निर्माण करतं. हे इंजिन शहरात स्मूथ ॲक्सिलरेशनसह 55.93kmpl इतकं रिअल मायलेज देते. दुसरीकडे, Jupiter 125 मध्ये 124.8cc चे इंजिन असून ते 8.2PS पॉवर आणि 10.5Nm टॉर्क निर्माण करतं. म्हणजेच, यात टॉर्क थोडा जास्त असल्याने सिटी रायडिंगदरम्यान जास्त स्मूथ परफॉर्मन्स मिळतो. याचे रिअल मायलेज सुमारे 52.91kmpl आहे.
दोन्ही स्कूटरमध्ये स्टील ट्यूब फ्रेम, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रियर मोनोशॉक सस्पेन्शन दिलेले आहेत. Jupiter 110 (Drum) व्हेरिएंटमध्ये 12-इंच स्टील व्हील्स मिळतात, तर Jupiter 125 (Drum Alloy) मध्ये 12-इंच अलॉय व्हील्स आहेत. दोन्ही स्कूटरचे टायर 90-सेक्शनचे असून, CBS (Combined Braking System) दोन्हीत स्टँडर्ड स्वरूपात दिलेले आहे. वजनाच्या बाबतीत Jupiter 110 चे वजन 106kg आहे, तर Jupiter 125 थोडी जड म्हणजेच 108kg आहे. दोन्हीत 163mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 5.1-लिटर इंधन टाकी दिलेली आहे.
Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 गाड्यांचा नक्की विचार करा
Jupiter 110 च्या बेस व्हेरिएंटमध्ये ॲनालॉग कन्सोल दिलेला आहे, ज्यामध्ये स्पीडोमीटर, फ्यूल गेज आणि ओडोमीटर आहेत. Jupiter 125 मध्ये ॲनालॉग स्पीडोमीटरसोबत डिजिटल इनसेट आहे, ज्यामध्ये ओडोमीटर, दोन ट्रिप मीटर, मायलेज आणि रेंज इंडिकेटर मिळतो. दोन्ही मॉडेल्समध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप फीचर आहे, मात्र USB चार्जिंग पोर्ट उपलब्ध नाही.
सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे दोन्ही स्कूटरमध्ये दिलेला 33-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 2-लिटर फ्रंट स्टोरेज स्पेस, ज्यामुळे या दोन्ही स्कूटर्स अधिक प्रॅक्टिकल आणि दररोजच्या वापरासाठी सोयीस्कर ठरतात.