फोटो सौजन्य: Pinterest
Mercedes-Benz EQS SUV Celebration Edition दोन सीटिंग कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.
5-सीटर व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.34 कोटी रुपये असून, 7-सीटर वर्जनची किंमत 1.48 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीनुसार, 2025 मध्ये EQS SUV ही भारतातील सर्वाधिक विकली गेलेली लक्झरी EV ठरली आहे.
EQS SUV Celebration Edition दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे – EQS SUV 450 आणि EQS SUV 580.
बजाज ऑटोकडून पुणे पोलीस दलासाठी विशेष बाईक्स! सानुकूलित केलेली डोमिनार केली सादर
हा व्हेरिएंट लक्झरी आणि कम्फर्टवर विशेष लक्ष केंद्रित करतो. यात 265 kW पॉवर आणि 800 Nm टॉर्क मिळतो. ही SUV 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 6.2 सेकंदात गाठते. याची सर्टिफाइड ड्रायव्हिंग रेंज 775 किमी आहे.
यामध्ये 122 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती 200 kW DC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ही बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 31 मिनिटे घेते. 4MATIC ऑल-व्हील ड्राइव्ह आणि AIRMATIC सस्पेन्शनमुळे उत्तम स्थिरता आणि कम्फर्ट मिळतो.
हा व्हेरिएंट अधिक पॉवर आणि फॅमिली वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. यात 400 kW पॉवर आणि 858 Nm टॉर्क मिळतो. ही SUV 0-100 किमी/तास वेग अवघ्या 4.8 सेकंदात गाठते. याची ड्रायव्हिंग रेंज 809 किमी पर्यंत आहे.
बॅटरी, चार्जिंग क्षमता आणि चार्जिंग वेळ EQS SUV 450 प्रमाणेच आहेत. तिसऱ्या रांगेतील सीटिंगमुळे हा वेरिएंट प्रीमियम फॅमिली EV म्हणून खास ओळख निर्माण करतो.
आता EQS SUV 450 व्हेरिएंटला देखील AMG Line देण्यात आली आहे, जी यापूर्वी फक्त 580 वेरिएंटमध्येच उपलब्ध होती. यामध्ये AMG बॉडी स्टायलिंग, A-विंग फ्रंट एप्रन, क्रोम रियर एप्रन आणि 21-इंच हाय-ग्लॉस ब्लॅक AMG अलॉय व्हील्स मिळतात.
केबिनमध्ये रियर सीट पॅकेज अंतर्गत दुसऱ्या रांगेतील बाहेरील सीट्स वेंटिलेटेड आहेत. यासोबतच प्रवाशांसाठी MBUX रियर टॅब्लेटची सुविधा देण्यात आली आहे.
Mercedes-Maybach GLS Celebration Edition ची एक्स-शोरूम किंमत 4.10 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने यासोबतच Maybach GLS चे उत्पादन आता भारतातच केले जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या SUV च्या किमतीत 40 लाख रुपये पेक्षा जास्त कपात शक्य झाली आहे.
या SUV मध्ये सिग्नेचर टू-टोन पेंट फिनिश देण्यात आली आहे. समोरच्या बाजूला वर्टिकल स्लॅट क्रोम ग्रिल आणि 23-इंच Maybach फाइव्ह-होल फोर्ज्ड व्हील्स यामुळे तिचा प्रीमियम लूक अधिक उठून दिसतो.
Maybach GLS चे इंटीरियर पूर्णपणे रियर पॅसेंजर्सच्या कम्फर्टवर केंद्रित आहे. यात दोन इंडिव्हिज्युअल रियर सीट्स, फुल-लेंथ सेंटर कन्सोल आणि MBUX रियर टॅब्लेट देण्यात आले आहे.
MANUFAKTUR लेदर पॅकेज अंतर्गत नप्पा लेदर अपहोल्स्ट्री, एग्झिक्युटिव्ह सीट्स आणि प्रीमियम रूफ लाइनर मिळतो. फीचर्समध्ये 29-स्पीकर Burmester हाय-एंड 3D सराउंड साउंड सिस्टीम, सीट मसाज, 9.6-लीटर रेफ्रिजरेटेड युनिट, शॅम्पेन फ्लूट होल्डर्स, E-ACTIVE बॉडी कंट्रोल आणि ॲडव्हान्स्ड अँटी-थेफ्ट सिस्टीमचा समावेश आहे.






