फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच मोठ्या प्रमाणात बाईक्सची विक्री होता असते. ज्यात बजेट फ्रेंडली बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. हीच क्रेझ आणि मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पदक कंपन्या देशात बेस्ट परफॉर्मन्स आणि मायलेज देणाऱ्या बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करत असतात. नुकतेच FY25 मधील सेल्स रिपोर्ट जारी झाला आहे. ज्यात भारतीय मार्केटमध्ये बाईक्सची दमदार विक्री पाहायला मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
FY25 मध्ये 10 मॉडेल्सच्या एकूण 99,40,428 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तर 2024 या आर्थिक वर्षात हा आकडा 91,55,207 युनिट्स होता. म्हणजेच 7,85,221 अधिक युनिट्स विकल्या गेल्या आणि 8.58 टक्क्यांची वाढ झाली. या सेल्स लिस्टमध्ये Hero Splendor अव्वल स्थानावर आहे. FY25 च्या 12 महिन्यांत ही बाइक अंदाजे 35 लाख लोकांनी खरेदी केली आहे. तसेच भारतीय ऑटोमार्केटमध्ये या बाईकचा 35% मार्केट शेअर आहे. चला अन्य बाईकच्या सेल्स परफॉर्मन्सबद्दल जाणून घेऊयात.
Bike की Maxy Scooter? निर्णयात गोंधळ चालूच? हे वाचा आणि घ्या योग्य निर्णय!
बेस्ट बाईकच्या सेल्सबद्दल बोलायचे झाले तर, FY25 मध्ये हिरो स्प्लेंडरच्या 34,98,449 युनिट्स विकल्या गेल्या. तर FY24 मध्ये 32,93,324 युनिट्स विकल्या गेल्या. यामुळे बाईकच्या विक्रीत 6.23% वाढ झाली. तसेच FY25 मध्ये होंडा शाइनने 18,91,399 युनिट्स विकले. तर FY24 मध्ये हीच संख्या 14,82,957 युनिट्स इतकी होती. यामुळे बाईकच्या विक्रीत 27.54% वाढ झाली.
FY25 मध्ये बजाज पल्सरने 13,25,816 युनिट्स विकल्या. तर FY24 मध्ये 14,10,974 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच 85, 158 युनिट्स कमी विकले गेले आहेत आणि त्यात 6.04% घट झाली. तर दुसरीकडे हिरो एचएफ डिलक्सने FY25 मध्ये 9,71,119 युनिट्स विकल्या. तर FY24 मध्ये 10,34,178 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच 63,059 युनिट्स कमी विकले गेले आहेत, ज्यात 6.1 टक्क्यांची घट झाली.
FY25 मध्ये टीव्हीएस अपाचेने 4,46,218 युनिट्स विकल्या. तर FY24 मध्ये 3,78,072 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच 68,146 युनिट्स अधिक विकले गेले आणि त्यात 18.02% वाढ झाली. त्याचा मार्केट शेअर 4.49% होता. FY25 मध्ये बजाज प्लॅटिनाने 4,38,740 युनिट्स विकल्या. तर FY24 मध्ये हीच संख्या 5,02,486 युनिट्स इतकी होती. म्हणजेच 63,746 युनिट्स कमी विकले गेले आणि त्यात 12.६९ टक्क्यांची घट झाली. त्याचा मार्केट शेअर 4.41% होता.
FY25 मध्ये टीव्हीएस रेडरची विक्री 3,99,819 युनिट्सवर पोहोचली, जी FY24 मधील 4,78,443 युनिट्सच्या तुलनेत 78,624 युनिट्सनी कमी होती. यामुळे विक्रीत 16.43% घट नोंदवली गेली. या कालावधीत टीव्हीएस रेडरचा मार्केट शेअर 4.02% होता.
दुसरीकडे, RE क्लासिक 350 ने FY25 मध्ये 3,50,732 युनिट्सची विक्री केली, जी FY24 मधील 3,22,370 युनिट्सच्या तुलनेत 28,362 युनिट्सने अधिक होती. त्यामुळे विक्रीत 8.8% वाढ झाली. यावेळी या मॉडेलचा मार्केट शेअर 3.53% होता.