April 2025 ठरला Honda साठी भरभराटीचा महिना, विकले 'तब्बल' इतके युनिट्स
भारतात टू व्हीलर सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. यात आता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे. Honda Motorcycle & Scooter India ही कंपनी मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून उत्तम दुचाकी ऑफर करत आहे. नुकतेच कंपनीने एप्रिल 2025 मधील सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टवरून असे दिसते मागील महिना कंपनीसाठी चांगलाच भरभराटीचा ठरला आहे. चला सेल्स रिपोर्टबद्दल जाणून घेऊयात.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने एप्रिल 2025 साठी विक्रीच्या आकडेवारीची घोषणा केली आहे. या महिन्यात कंपनीने एकूण 4,80,896 युनिट्सची विक्री केली असून त्यात 4,22,931 युनिट्सची देशांतर्गत विक्री तर 57,965 युनिट्सची निर्यात यांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे आकडे चांगले आहेत.
अनेक फीचर्सने सुसज्ज तरी किंमत कमीच, Toyota Innova चा Exclusive Edition लाँच
उत्पादन विभागात, HMSI ने लोकप्रिय Dio 125 स्कूटरला OBD2B उत्सर्जन नियमांनुसार अद्ययावत करत अधिक फीचर्ससह सादर केले आहे. कंपनीच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये 2025 मॉडेल्समध्ये CB350, H’ness CB350 आणि CB350RS हे नवीन रंगांत ग्राहकांसमोर सादर केले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या निकषांनुसार 2018-2020 दरम्यान बनवलेल्या काही CB300R युनिट्ससाठी स्वयंसेवी री-कॉल जाहीर करण्यात आला आहे.
रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी HMSI ने भारतातील 12 ठिकाणी विशेष अभियान राबवले. यामध्ये नवसारी, योल कँट, राजापलायम, रांची, बेंगडुबी, ग्वाल्हेर, पुणे, वाराणसी, अनंतपूर, तिरुवल्लूर, जयपूर आणि नवी दिल्ली या शहरांचा समावेश होता. याशिवाय, हैदराबादमधील ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने रस्ता सुरक्षेसंबंधी आपल्या प्रयत्नांना गती दिली.
CSR उपक्रमांतर्गत, होंडा इंडिया फाउंडेशनने शिलाँग (मेघालय) येथे ‘प्रोजेक्ट बुनियाद’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप केला. या उपक्रमात 30 युवकांना रोजगाराच्या संधी देणारे जॉब ऑफर्स करण्यात आले.
मोटरस्पोर्ट्सच्या आघाडीवर, एप्रिलमध्ये कतार व स्पेन येथे झालेल्या MotoGP स्पर्धांमध्ये होंडाच्या लुका मारिनीने दमदार कामगिरी करत सलग चौथ्यांदा टॉप 10 मध्ये स्थान मिळवले. जोआन मीरने देखील चांगली सुरुवात केली, मात्र त्याला स्पर्धा अपूर्ण सोडावी लागली.
HMSI चा एप्रिल 2025 चा आढावा संपूर्णत: उत्पादन, सुरक्षा, CSR आणि स्पर्धांमधील योगदानावर आधारित होता.