फोटो सौजन्य: @Toyota_India (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. मात्र,जेव्हा प्रश्न जॉईंट फॅमिलीचा येतो. तेव्हा अनेकांच्या नजरेसमोर एकाच कारचे नाव समोर येते. ही कार म्हणजे Toyota Innova. टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. मात्र, कंपनीच्या इनोव्हाची एक वेगळीच क्रेझ मार्केटमध्ये पाहायला मिळते. Innova चे वेगवेगळे व्हेरियंत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. Toyota Innova Hycross हे त्यातीलच एक.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही भारतीय मार्केटमधील खूप लोकप्रिय कार आहे. या 7-सीटर कारच्या बेस मॉडेल GX 7STR (पेट्रोल) ला देखील बाजारात खूप चांगली मागणी आहे. इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 19 लाख 94 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 31 लाख 34 हजार रुपयांपर्यंत जाते. ही कार खरेदी करण्यासाठी, तुम्हाला एकाच वेळी पूर्ण पैसे भरावे लागण्याची आवश्यकता नाही. ही कार तुम्ही लोनवर देखील खरेदी करू शकता.
Mercedes कडून भन्नाट कार लाँच, फक्त 30 ग्राहकच बानू शकतील याचे मालक
नोएडामध्ये टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत 23 लाख 17 हजार रुपये आहे. देशातील इतर राज्यांमध्ये वाहनांवर वेगवेगळे टॅक्स असल्याने, या कारच्या ऑन-रोड किमतीत फरक दिसू शकतो. कार खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या लोनवर सुमारे 9 टक्के व्याज आकारले जाते, ज्यामुळे EMI च्या स्वरूपात बँकेत निश्चित रक्कम जमा करावी लागते.
ही टोयोटा कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20.85 लाख रुपयांचे लोन मिळेल. लोनची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला जास्त रक्कमेचे लोन मिळू शकते.
ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2.32 लाख रुपयांचे डाउन पेमेंट जमा करावे लागतील. यापेक्षा जास्त रक्कम जमा करून तुम्ही कर्जाचा हप्ता कमी देखील करू शकता.
जर तुम्ही ही टोयोटा कार खरेदी करण्यासाठी 4 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने दरमहा 51,900 रुपये बँकेत जमा करावे लागतील. जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 5 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला 60 महिन्यांसाठी 9 टक्के व्याजदराने दरमहा 43,300 रुपये हप्ता जमा करावा लागेल.
जर तुम्ही ही टोयोटा कार खरेदी करण्यासाठी 6 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा 37,600 रुपये हप्ता भरावा लागेल. जर इनोव्हा हायक्रॉस खरेदी करण्यासाठी 7 वर्षांसाठी लोन घेतले असेल आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर दरमहा 33,550 रुपये EMI म्हणून जमा करावे लागेल.
टोयोटा इनोव्हा हायक्रोस लोनवर खरेदी करण्यासाठी, तुमचा महिन्याचा पगार सुमारे 1 लाख रुपये तरी असला पाहिजे. यासोबतच, लोन मंजूर करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे देखील महत्त्वाचे आहे.