Yamaha कडून दुसरी FZ‑X Hybrid बाईक लाँच, दमदार परफॉर्मन्ससह मिळणार उत्तम मायलेज
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंट बाईक ऑफर केल्या जातात. तसेच, काळानुसार अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या नव्या तंत्रज्ञानासह बाईक ऑफर करत आहे. या नव्या बाईकला सुद्धा मार्केटमध्ये चांगली मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाजारात दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक.
देशात अनेक उत्तम दुचकी उत्पादक कंपन्या आहेत. यामाहा ही त्यातीलच एक. कंपनीने देखील आपल्या बाईकमध्ये दमदार टेक्नॉलॉजी समाविष्ट केले आहे. अलीकडेच, यामाहाने देशातील पहिली हायब्रिड बाईक Yamaha FZ-S Fi हायब्रिड भारतीय बाजारात लाँच केली होती. आता कंपनीने त्यांची दुसरी हायब्रिड बाईक आणली आहे. याचे नाव Yamaha FZ-X हायब्रिड आहे. याबद्दल, कंपनीचा दावा आहे की बाईकच्या परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल न करता तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात आल्या आहेत. चला यामाहाच्या दुसऱ्या हायब्रिड बाईकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हीच कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! MG Motors कडून मिळतंय 3.5 लाखांपर्यंतचे डिस्काउंट
यामाहा FZ-X हायब्रिडमध्ये 149cc सीसी एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 12.4 एचपी पॉवर आणि 13.3 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकचे वजन स्टॅंडर्ड व्हर्जनपेक्षा 2 किलो जास्त आहे म्हणजेच 141 किलो. त्यातील हायब्रिड सिस्टमचा वापर प्रामुख्याने मायलेज वाढवण्यासाठी केला जातो. त्याच्या इंजिनचे स्पेसिफिकेशन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे.
यामाहा FZ-X हायब्रिडमध्ये सायलेंट स्टार्ट आणि स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी (ISG), अपडेटेड स्विचगियर आणि नवीन फंक्शन्सचे कंट्रोल, 4.2 कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच, मॅट टायटन ग्रीन कलरमध्ये सोनेरी चाकांसह एक अनोखा लूक देण्यात आला आहे. त्यात आढळणारे फीचर्स FZ-S हायब्रिडसारखेच आहेत.
या आठवड्यात लाँच होणार सर्वात स्वस्त Electric MPV? जाणून घ्या फीचर्स आणि अपेक्षित किंमत
भारतीय ऑटो बाजारात ही बाईक 1.49 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. याची किंमत स्टँडर्ड FZ-X पेक्षा 20000 रुपये जास्त आणि FZ-S हायब्रिड पेक्षा 5000 रुपये जास्त आहे. यामाहा FZ-X हायब्रिड ही एक प्रॅक्टिकल, तांत्रिकदृष्ट्या फायदेशीर आणि अपडेटेड बाईक आहे. ज्यांना रोजच्या वापराच्या बाईकमध्ये काही प्रगत फीचर्स हवी आहेत त्यांच्यासाठी ही बाईक एक चांगला पर्याय ठरू शकतो. यासोबतच बाईकचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला आहे. यामाहाची ही नवीन ऑफर निश्चितच 150 सीसी सेगमेंटमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचा विस्तार केला आहे.