फोटो सौजन्य: @i_adarshkashyap (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. ग्राहक देखील आता इंधनावर चालणाऱ्या कार पेक्षा इलेक्ट्रिक कार्सना जास्त प्राधान्य देत आहेत. एकंदरीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतीय ऑटोमोबाईल मार्केट आता अनुकूल बनत चालले आहे. यामुळे अन्य इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्या देखील भारतात येऊ पाहत आहेत. नुकतेच Tesla ने आपली इलेक्ट्रिक कार Model Y भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे.
टेस्लाने आज 15 जुलै 2025 रोजी भारतीय मार्केटमध्ये दमदार एंट्री केली आहे. कंपनीचा पहिला शोरूम आज भारतात सुरू झाला आहे. तसेच, कंपनीने शोरूम उघडण्यापूर्वी भारतातील त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार Tesla Model Y च्या किंमती जाहीर केल्या आहेत. टेस्ला मॉडेल वायची किंमत किती आहे आणि त्यात कोणते खास फीचर्स आहेत? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ 3 CNG Car असेल तुमच्यासाठी परफेक्ट, किंमत फक्त…
टेस्ला मॉडेल वाय दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. Rear-wheel Drive आणि Long Range Rear-wheel Drive. चला याच्या किंमतीबद्दल जाणून घेऊयात.
दिल्ली आणि मुंबईमध्ये RWD व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख असून ऑन-रोड किंमत 61.07 लाख आहे. तेच LR-RWD व्हेरिएंट 67.89 लाख एक्स-शोरूम आणि 69.15 लाख ऑन-रोड किमतीत उपलब्ध आहे. मात्र गुरुग्राममध्ये याच व्हेरिएंटसाठी ऑन-रोड किंमतीत लक्षणीय वाढ दिसून येते. गुरुग्राममध्ये RWD व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत ₹66.07 लाख असून LR-RWD व्हेरिएंटसाठी ती ₹75.61 लाखांपर्यंत जाते.
भारतातील मॉडेल Y ची किंमत इतर प्रमुख मार्केटच्या तुलनेत खूपच जास्त आहे. अमेरिकेत मॉडेल Y ची किंमत $44,990 पासून सुरू होते. चीनमध्ये मॉडेल Y ची किंमत 263,500 युआन पासून सुरू होते. जर्मनीमध्ये मॉडेल Y ची किंमत 45,970 युरो पासून सुरू होते.
फक्त 50 हजारांच्या डाउन पेमेंटवर Hyundai Creta खरेदी केली तर किती असेल EMI?
टेस्ला मॉडेल Y एकाच कॉन्फिगरेशन ऑप्शनसह येणार आहे. मॉडेल Y RWD व्हेरिएंटची रेंज 500 किमी पर्यंत असेल, तर मॉडेल Y लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची रेंज 622 किमी पर्यंत असेल. दोन्हीचा टॉप स्पीड 201 किमी प्रतितास आहे. तसेच याचा RWD व्हेरिएंट 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी पर्यंत स्पीड वाढवू शकतो. तर लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंट 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी पर्यंत वेग वाढवू शकतो.
मागील मॉडेलच्या तुलनेत टेस्ला मॉडेल वायच्या नवीन व्हर्जनमध्ये अनेक डिझाइन अपडेट्स पाहायला मिळाले आहेत. त्याच्या पुढच्या भागात अधिक आकर्षक लाईट्स आहेत, जे इलेक्ट्रिक कारला अधिक चांगला आणि आकर्षक लूक देतात. याशिवाय, साइझमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील बाजूस कनेक्टेड टेल लाईट्स देण्यात आले आहेत. हे पर्ल व्हाइट, स्टील्थ ग्रे, डीप ब्लू मेटॅलिक, अल्ट्रा रेड,डायमंड ब्लॅक आणि क्विकसिल्व्हर सारख्या पेंट कलर डिझाइनसह ऑफर केले आहे.