फोटो सौजन्य: iStock
प्रमुख प्रीमियम कार निर्माता Kia इंडियाने आज दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा केली आहे. सुनहॅक पार्क यांची चीफ सेल्स ऑफिसर (CSO) तर जूनसू चो यांची चीफ बिझनेस ऑफिसर (CBO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
CSO या नव्या भूमिकेत, पार्क किया इंडियाच्या विक्री धोरणाचे नेतृत्व करतील. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये टिकाऊ वाढ वाढवणे, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे, आणि ब्रँडची बाजारातील उपस्थिती विस्तार करणे यांचा समावेश असेल. 28 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह अनुभवासह त्यांनी किया हेडक्वार्टर्स, मध्य पूर्व आणि आफ्रिका (MEA) तसेच भारत येथे अनेक महत्त्वाच्या नेतृत्व भूमिका पार पाडल्या आहेत.
ट्रक लहान पण कीर्ती महान! मुंबईत जगातील पहिला 1 टन क्षमतेचा Electric Mini Truck लाँच, किंमत तर…
CBO म्हणून, चो व्यापक व्यवसाय धोरणे तयार करणे, उत्पादन आराखडा तयार करणे, एक्स्पोर्ट आणि लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, तसेच क्रॉस-फंक्शनल टीम्सचे नेतृत्व या जबाबदाऱ्या सांभाळतील. 32 वर्षांहून अधिक अनुभव असलेले चो यांनी ऑस्ट्रेलिया, यूके आणि युरोप या बाजारपेठांमध्ये विविध जागतिक पदांवर काम केले आहे.
“चीफ सेल्स ऑफिसर म्हणून भूमिका स्वीकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. सध्या किया इंडिया एका रोमांचक टप्प्यावर आहे. आम्ही भारतासारख्या गतिशील ऑटो बाजारपेठेत आमची उपस्थिती अधिक मजबूत करत आहोत. माझे लक्ष विक्री वाढवणे, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणा करणे आणि डीलर-भागीदार नेटवर्क अधिक मजबूत करणे यावर असेल.”
नाव एकसारखेच तरी सुद्धा Mahindra Bolero आणि Bolero Neo मध्ये ‘हा’ आहे फरक
“चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून भूमिका स्वीकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. किया इंडियाने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. माझे प्राधान्य टिकाऊ वाढ, कार्यक्षम व्यवसाय धोरणे आणि दीर्घकालीन ऑपरेशनल उत्कृष्टतेकडे असेल.”
या बदलासह, किया इंडियाने भारतातील आपल्या नेतृत्व संघाच्या बळकटीकरणाद्वारे भारतीय बाजारावरील आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. कंपनीचे लक्ष नावीन्य, ग्राहक-केंद्रितता आणि भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढीवर केंद्रित राहील.