फोटो सौजन्य: viralbhayani/ Instagram
सध्या संजू बाबा त्याच्या अलीकडील चित्रपट ‘धुरंधर’ मुळे चर्चेत आहे. चाहते अजूनही या चित्रपटाबद्दल उत्सुक असताना संजय दत्त मुंबईत त्याच्या टेस्ला सायबरट्रकसह दिसला आहे. टेस्ला सायबरट्रकसह संजय दत्तचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काय खास आहे आणि सायबरट्रकमध्ये कोणते फीचर्स आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायबरट्रकचा लूक आणि त्याची नंबर प्लेट. हा टेस्ला सायबरट्रक अधिकृतपणे भारतात खरेदी केलेला नाही, तर तो एक आयात केलेला युनिट आहे. असाही दावा केला जात आहे की नंबर प्लेटवरून हे वाहन दुबईहून आयात केले गेले आहे. म्हणूनच, असा अंदाज आहे की ते कार्नेट परमिट वापरून भारतात आणले गेले असावे.
टेस्ला सायबरट्रक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: लाँग रेंज, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि सायबरबीस्ट. यापैकी, सायबरबीस्ट हा टॉप-एंड व्हेरिएंट असल्याचे म्हटले जाते.
भारतीय बाजारात सध्या टेस्लाची केवळ Model Y ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. Cybertruck ने अद्याप भारतात अधिकृत प्रवेश केलेला नाही. मात्र, ही इलेक्ट्रिक पिकअप भारतात आयात करण्यात आली, तर ड्युअल मोटर AWD व्हेरिएंटची अंदाजे किंमत 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये दरम्यान असू शकते. तर ट्रिपल मोटर सेटअप असलेल्या Cyberbeast मॉडेलची किंमत 2.10 कोटी ते 2.50 कोटी रुपये इतकी जाण्याची शक्यता आहे.






