फोटो सौजन्य: Pinterest
सुझुकीने त्यांची नवीन सुझुकी ई-अॅक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, ज्याची किंमत 1.88 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. सुझुकी ई-अॅक्सेस भारतातील सर्वात लोकप्रिय प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर, Ather 450 Apex शी थेट स्पर्धा करणार आहे. यामुळे या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला आहे हा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Suzuki e-Access आणि Ather 450 Apex हे दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स जवळपास समान किंमत श्रेणीत उपलब्ध आहेत. Ather 450 Apex ची एक्स-शोरूम किंमत 1,89,946 असून, Suzuki e-Access 1,88,490 रुपयांमध्ये मिळतो. म्हणजेच दोन्ही स्कूटर्समधील किंमतीचा फरक केवळ 1,456 रुपयांइतकाच आहे. एवढ्या कमी फरकात ग्राहकांना जास्त परफॉर्मन्स की विश्वासार्ह ब्रँडसोबत संतुलित रायडिंग अनुभव, यापैकी काय निवडायचे? हे ठरवावे लागते.
Suzuki e-Access मध्ये 3.07 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, एका चार्जमध्ये सुमारे 95 किमी रेंज देते. याची टॉप स्पीड 71 किमी/तास आहे, जी दैनंदिन वापरासाठी योग्य मानली जाते. दुसरीकडे, Ather 450 Apex मध्ये 3.7 kWh ची मोठी बॅटरी असून, ती सुमारे 157 किमी रेंज देण्याचा दावा करते. याची कमाल वेगमर्यादा 100 किमी/तास असल्याने हा स्कूटर अधिक वेगवान आणि स्पोर्टी ठरतो.
परफॉर्मन्सच्या बाबतीत Ather 450 Apex स्पष्टपणे आघाडीवर आहे. हा स्कूटर 9.38 बीएचपी पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करतो. तर Suzuki e-Access 5.49 बीएचपी पॉवर आणि 15 Nm टॉर्क देते. Ather चा एक्सीलरेशन आणि एकूण रायडिंग अनुभव अधिक दमदार असून, Suzuki e-Access आरामदायी आणि स्मूद रायडिंगवर भर देतो.
Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…
जास्त रेंज, वेगवान परफॉर्मन्स आणि स्पोर्टी फील हवी असल्यास Ather 450 Apex ही स्कूटर उत्तम पर्याय ठरते. मात्र, सुजुकीच्या विश्वासार्ह ब्रँडसोबत संतुलित परफॉर्मन्स आणि प्रीमियम अनुभव हवा असल्यास Suzuki e-Access देखील एक चांगला पर्याय आहे.






