फोटो सौजन्य: @Hardwire_news (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. ग्राहकांची बदलती जीवनशैली आणि आर्थिक क्षमतांमध्ये वाढ झाल्यामुळे फॉर व्हीलर वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. या वाढत्या मागणीचा विचार करून अनेक ऑटो कंपन्या भारतीय ग्राहकांसाठी नव्या आणि लेटेस्ट फीचर्सनी सुसज्ज कार्स सादर करत आहेत.
नुकतेच टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार Tata Altroz चे फेसलिफ्ट व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये अधिक आकर्षक डिझाइन, स्मार्ट फीचर्स आणि सुरक्षेच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच अल्ट्रोजमध्ये मोठा बदल होत आहे. पॉवरट्रेन व्यतिरिक्त, या कारच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. चला या कारच्या पाच मोठ्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे इतरांपेक्षा खूप चांगले आणि मजबूत बनले आहे.
तीच प्रीमियम हॅचबॅक कार पण एका नव्या रूपात ! अखेर मार्केटमध्ये Tata Altroz Facelift 2025 लाँच
टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये पूर्णपणे नवीन 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे, जो जुन्या 7-इंचाच्या पार्ट-डिजिटल, पार्ट-अॅनालॉग युनिटची जागा घेतो. हे त्याच्या टॉप मॉडेलसाठी खास आहे, जे एका मोठ्या एचडी स्क्रीन मॅप व्ह्यू आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंगसह येते.
नवीन अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये दोन-स्पोक स्टिअरिंग व्हील आहे ज्यावर ग्लॉस-ब्लॅक पॅनेलमध्ये इल्यूमिनेटेड टाटा लोगो आहे. त्यात स्मार्ट डिजिटल स्टीअरिंग क्रूझ, ऑडिओ आणि फोन कॉल सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
आगामी अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये एलईडी लाईट बार आहे, जो लाईट्सना जोडतो आणि एक T बनवतो. ज्यामुळे ही कार पूर्वीपेक्षाही चांगली दिसते.
अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये पुल-टाइप फ्रंट डोअर हँडल्सऐवजी टाटा कर्व्हसारखे फ्लश-टाइप डोअर हँडल्स आहेत, ज्यात इल्युमिनेशन आहे. मागील बाजूस, टाटा कारमध्ये पूर्वीप्रमाणेच सी-पिलर-माउंट केलेले दरवाजाचे हँडल कायम आहेत.
हायब्रीड इंजिन, 35 km चा मायलेज आणि अनेक सेफी फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ SUVs लवकरच होणार लाँच
टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट एकूण पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, जे प्रिस्टाइन व्हाइट, प्युअर ग्रे, रॉयल, अंबर ग्लो आणि ड्यून ग्लो आहेत. त्यात दोन नवीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, त्याचा डाउनटाउन रेड पेंट आता बंद करण्यात आला आहे.
23 मे रोजी भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर, टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्ट ह्युंदाई आय20, टोयोटा ग्लांझा आणि मारुती बलेनो सारख्या कारशी स्पर्धा करेल.