फोटो सौजन्य: tellychakkar (Insta)
भारतीय मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली कार्सची जरी मोठ्या प्रमाणात विक्री होत असली तरी आजही लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ही क्रेझ फक्त सामन्यांमध्ये नाही तर सेलिब्रेटी मंडळींमध्ये सुद्धा पाहायला मिळते. नुकतेच बॉलिवूड अभिनेता राम चरण याने आलिशान Lamborghini Urus SE खरेदी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या कारची किंमत तब्बल 5 कोटी रुपये आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राम कपूर यांनी नवीन Lamborghini Urus SE एसयूव्ही जोडली आहे. ही परफॉर्मन्स -सेंट्रिक एसयूव्ही 2024 मध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आली होती आणि त्याची सुरुवातीची किंमत 4.57 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. ब्रँडच्या सध्याच्या लाइनअपमध्ये ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.
Renault Triber आणि Kiger Facelift ची होतेय टेस्टिंग, लाँच आगोदरच मिळाली ही महत्वाची माहिती
राम कपूर त्यांच्या नवीन कारची डिलिव्हरी घेत असल्याचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या छोट्या क्लिपमध्ये अभिनेता डीलरशिप कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसतो. नंतर, तो त्यांच्या नवीन कारसह पोज देताना दिसत आहे. अभिनेता त्यांच्या वाहनाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला देखील दिसत आहे.
Lamborghini Urus SE मध्ये 4.0-लिटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन आहे, जे 620 एचपी आणि 800 एनएम टॉर्क देते. हे प्लग-इन हायब्रिड सिस्टमसह येते, जे 25.9 किलोवॅट प्रति तासाच्या लिथियम-आयन बॅटरी पॅकवर अवलंबून असते. हायब्रिड सिस्टममध्ये वापरलेली इलेक्ट्रिक मोटर 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये ठेवली जाते, ज्यामुळे एकूण 800 एचपी आणि 950 एनएम आउटपुट होते.
Skoda च्या सर्वात स्वस्त कारची धमाकेदार विक्री, मात्र आता किंमतीत झाली मोठी वाढ
Lamborghini Urus SE शिवाय, राम कपूर यांच्याकडे पोर्श 911, पोर्श 911 टर्बो एस, फेरारी पोर्टोफिनो एम, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, मर्सिडीज-एएमजी जी 63 आणि इतर काही विदेशी कार आहेत.