फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com
भारतीय ऑटो बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Kia Motors. या ऑटो कंपनीने भारतात दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या काही कारने तर भारतीय ग्राहकांच्या मनातच घर केले आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Kia Seltos. आता किआची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Seltos ची दुसरी जनरेशन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या नवीन सेल्टोसमध्ये केवळ नवीन डिझाइनच नाही तर अनेक नवीन फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणार आहे. चला जाणून घेऊयात, नवीन सेल्टोसमध्ये कोणते बदल आणि नवीन फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात?
नवीन किआ सेल्टोस आकारात मागील जनरेशन सारखीच राहील, परंतु अनेक डिझाइन एलिमेंट पूर्णपणे नवीन असतील. नवीन हेडलाइट्स, टेललाइट्स, ग्रिल आणि बॉडी पॅनल्स एसयूव्हीला पूर्णपणे नवीन लूक देतात. अलॉय व्हील्स आणि ओआरव्हीएम डिझाइन देखील अपडेट केले गेले आहे. हे डिझाइन कियाच्या नवीन तत्वज्ञानाशी सुसंगत असेल, जसे की नवीन Carnival, Syros आणि Carens Clavis मध्ये दिसून येते.
पुन्हा दिसली Tata Sierra; मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती, केव्हा होणार लाँच?
या कारचे इंटिरिअरचे डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत, परंतु अशी अपेक्षा आहे की नव्या Kia Seltos मध्ये पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड, डोअर ट्रिम्स, सीट्स आणि सेंट्रल कन्सोल पाहायला मिळेल. सध्या असलेला ट्विन स्क्रीन सेटअप आता अपडेट होऊन 12.3-इंच स्क्रीनसह येऊ शकतो. पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे फीचर्स पूर्वीप्रमाणेच मिळतील.
नवीन Kia Seltos मध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा आणि Level-2 ADAS सिस्टीम दिली जाणार आहे. सध्याच्या मॉडेलला मिळालेली 3-स्टार NCAP रेटिंग नव्या जनरेशनमध्ये सुधारून 5-स्टारपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे.
Maruti S Presso साठी दरमहा द्यावा लागेल फक्त 5 हजारांपेक्षा कमी EMI, फॉलो करा ‘हा’ फायनान्स प्लॅन
नव्या Seltos मध्ये पूर्वीप्रमाणेच तीन इंजिन पर्याय उपलब्ध असतील. यात 1.5-लीटर NA पेट्रोल, 1.5-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक, 6-स्पीड iMT, CVT आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक यांचा समावेश असेल. जागतिक बाजारपेठेत या SUV च्या हायब्रिड व्हर्जनवरही चर्चा सुरू आहे.