Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच
टाटा मोटर्सचे हे ट्रक्स कठोर युरोपियन क्रॅश सेफ्टी मानक (ECE R29 03) पूर्ण करतात. यामुळे वाहनांची उत्पादकता वाढते, एकूण मालकी खर्च कमी होतो आणि अपटाइममध्ये लक्षणीय सुधारणा होते.
Fortuner पेक्षाही महाग! भारतात Ducati ची नवीन बाईक लाँच, फक्त 1 हजार युनिट्सची होणार विक्री
टाटा मोटर्सचे एमडी आणि सीईओ गिरीश वाघ म्हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्र वेगाने बदलत आहे. आमचा नेक्स्ट-जनरेशन पोर्टफोलिओ अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्ससाठी तयार करण्यात आला आहे. अझुरा सिरीज, नवीन I-Moev आर्किटेक्चरवरील इलेक्ट्रिक ट्रक्स, सुधारित युरोपियन केबिन्स, जास्त पेलोड क्षमता आणि उत्तम इंधन कार्यक्षमता यामुळे ग्राहकांच्या नफ्यात थेट वाढ होईल. हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”
टाटा मोटर्सने अझुरा ही ऑल-न्यू श्रेणी सादर केली असून ती इंटरमिजिएट आणि लाइट कमर्शियल व्हेईकल (ILMCV) विभागासाठी डिझाइन करण्यात आली आहे. आरामदायी केबिन, उच्च अपटाइम आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे अझुरा चालकांचा थकवा कमी करते.
अझुरा सिरीजमध्ये 3.6-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले असून ती 7 टन ते 19 टन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होणार आहे. ई-कॉमर्स, FMCG, व्हाईट गुड्स, बांधकाम साहित्य, कृषी व औद्योगिक वाहतुकीसाठी ही श्रेणी उपयुक्त आहे.
सिग्ना, प्राइमा, अल्ट्रा आणि अझुरा या सर्व श्रेणींमध्ये फ्रंट, साइड व रोलओव्हर प्रोटेक्शन असलेले केबिन्स देण्यात आले आहेत. याशिवाय ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, कोलिजन मिटीगेशन सिस्टम्ससह तब्बल 23 पर्यंत ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. Fleet Edge कनेक्टेड प्लॅटफॉर्मद्वारे रिअल-टाइम ड्रायव्हिंग मॉनिटरिंगमुळे सुरक्षिततेत आणखी भर पडते.
टाटा मोटर्सने केलेल्या अपग्रेड्समुळे पेलोड क्षमता 1.8 टनांपर्यंत वाढली आहे. प्रगत 6.7-लिटर Cummins डिझेल इंजिनमुळे 7% पर्यंत जास्त इंधन कार्यक्षमता मिळते. Fleet Edge Priority सेवेमुळे ग्राहकांना वाहनांची हेल्थ, प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स आणि ट्रिप मॅनेजमेंटची माहिती रिअल-टाइममध्ये मिळते.
हरित लॉजिस्टिक्सच्या दिशेने टाटा मोटर्सने I-Moev (Intelligent Modular Electric Vehicle) आर्किटेक्चरवर आधारित 7 टन ते 55 टन इलेक्ट्रिक ट्रक्स लाँच केले आहेत. यात Ultra EV (7, 9, 12 टन), Prima E.55S Prime Mover (470 kW पॉवर, 453 kWh बॅटरी) आणि Prima E.28K टिपर यांचा समावेश आहे. हे ट्रक्स ई-कॉमर्स, बांधकाम, खाणकाम आणि पोर्ट ऑपरेशन्ससाठी उपयुक्त आहेत.
स्वदेशी तंत्रज्ञान, मजबूत चार्जिंग इकोसिस्टम आणि सानुकूलित फायनान्सिंग पर्यायांमुळे ई-ट्रकिंग अधिक विश्वासार्ह बनणार आहे.






