फोटो सौजन्य: @Kranti_Sambhav (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढतना दिसत आहे. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्या दमदार रेंज आणि फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार्सना जास्त प्राधान्य देत आहे.
देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी Mahindra ने देखील मार्केटमध्ये आपल्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या आहेत. या एसयूव्ही म्हणजे BE6 आणि XEV 9e. नुकतेच कंपंनीने या एसयूव्हीचे लॉंग रेंज व्हेरिएंट्स अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे आता त्यांच्या पॅक टू व्हेरिएंटमध्ये मोठा 79kWh बॅटरी पॅक देखील मिळेल, जो पूर्वी फक्त सर्वात महागड्या पॅक थ्री व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होता.
टाटा मोटर्सकडून हॅरियर.इव्हीचे उत्पादन दणक्यात सुरु, लवकरच मिळणार डिलिव्हरी
खरं तर, महिंद्राचा हा निर्णय अशा लोकांना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे ज्यांना लॉंग रेंजची आवश्यकता आहे परंतु टॉप फीचर्ससाठी जास्त पैसे खर्च करायचे नाहीत. यामुळे ग्राहकांना चांगली रेंज आणि योग्य किमतीत एक उत्तम पर्याय मिळेल.
महिंद्रा BE6 आणि XEV 9e च्या पॅक टू व्हेरिएंटमध्ये आता दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत, एक म्हणजे 59kWh स्टॅंडर्ड बॅटरी पॅक आणि दुसरा म्हणजे 79kWh लॉंग रेंज बॅटरी पॅक. महिंद्रा BE6 चा पॅक टू 79kWh लॉंग रेंज व्हेरिएंट आता टॉप पॅक थ्री व्हेरिएंटपेक्षा 3.4 लाख रुपये स्वस्त आहे, तर XEV 9e चा तोच प्रकार 4 लाख रुपयांपर्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. जरी महिंद्रा या मोठ्या बॅटरीसाठी 1.6 लाख रुपये अतिरिक्त आकारत असली तरी, हा पर्याय टॉप-स्पेक मॉडेल्सपेक्षा अधिक परवडणारा आहे.
रेंजबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा BE6 चा लाँग रेंज व्हेरिएंट 683 किमी पर्यंतचा रेंज देतो, जो त्याच्या 59kWh व्हर्जनपेक्षा 126 किमी जास्त आहे. त्याचप्रमाणे, XEV 9e चा लाँग रेंज व्हेरिएंट 656 किमी पर्यंतचा रेंज देतो, जो स्टँडर्ड व्हेरिएंटपेक्षा 114 किमी जास्त आहे. यावरून हे स्पष्ट होते की आता जे ग्राहक फक्त जास्त रेंज शोधत आहेत त्यांना टॉप व्हेरिएंटवर अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नाही.
6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ कारने इतर ऑटो ब्रँड्सचा उतरवला माज, एका झटक्यात मिळवले 1 लाख ग्राहक
महिंद्राने असेही पुष्टी केली आहे की आतापर्यंत फक्त BE6 आणि XEV 9e च्या पॅक थ्री व्हेरिएंटची डिलिव्हरी सुरू झाली आहे, परंतु पॅक टू लाँग रेंज व्हेरिएंटची डिलिव्हरी जुलै 2025 च्या अखेरीस सुरू होईल. तसेच, ज्या ग्राहकांनी या कार आधीच बुक केल्या आहेत त्यांना त्यांचे बुकिंग नवीन 79kWh पॅक टू व्हेरिएंटमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय मिळेल.
हा बदल अशा ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना लॉंग रेंजची कार हवी आहे, परंतु अधिक महाग टॉप व्हेरिएंट घेऊ इच्छित नाहीत. आता त्यांना तीच मोठी बॅटरी आणि रेंज मिळत आहे, परंतु कमी किमतीत. यासह, ग्राहक 3.4 ते 4 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात आणि परफॉर्मन्समध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.