टाटा मोटर्सकडून हॅरियर.इव्हीचे उत्पादन दणक्यात सुरु, लवकरच मिळणार डिलिव्हरी
भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचा आघाडीचा चेहरा ठरलेल्या टाटा मोटर्सने आज त्यांच्या अत्याधुनिक आणि संपूर्ण भारतात उत्सुकतेने वाट पाहिलेल्या हॅरियर.इव्ही या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन अधिकृतपणे सुरू केले आहे. ही कार टाटाच्या पुणे येथील प्रगत उत्पादन सुविधेतून प्रथमच प्रॉडक्शन लाइनवर उतरली. विशेष म्हणजे, या कारसाठी आधीच प्रचंड बुकिंग्स झालेली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जुलै 2025 पासून या कारच्या डिलिव्हरीज अधिकृतरित्या सुरू होतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
हॅरियर.इव्ही ही फक्त एक कार नसून ती नव्या युगाच्या परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानाची साक्ष देणारी “इंटेलिजंट एसयूव्ही” म्हणून सादर करण्यात आली आहे. ही कार प्रगत एक्टिव्ह.इव्ही+ (acti.ev+) आर्किटेक्चरवर आधारित आहे, जी ड्युअल मोटर सेटअप आणि क्वॉड व्हील ड्राइव्ह (4WD) यासारखे पॉवरफुल फीचर्स देते. परिणामी, हॅरियर.इव्ही अत्युच्च टॉर्क आणि फास्ट एक्सलरेशन प्रदान करते, जे भारतीय एसयूव्ही क्षेत्रात यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते.
6 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ कारने इतर ऑटो ब्रँड्सचा उतरवला माज, एका झटक्यात मिळवले 1 लाख ग्राहक
डिझाइनच्या बाबतीतही हॅरियर.इव्ही एक स्टाईल स्टेटमेंट आहे. ती चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टिन व्हाइट आणि प्युअर ग्रे. शिवाय, यामध्ये स्टील्थ एडिशन देखील आहे, ज्यामध्ये मॅट ब्लॅक एक्स्टिरीयर आणि फुली ब्लॅक इंटिरिअर यांसह एक परिपूर्ण आकर्षण आणि आक्रमकतेचा अनुभव मिळतो.
हॅरियर.इव्हीमध्ये देण्यात आलेले आधुनिक इनोव्हेटिव्ह फीचर्स हे संपूर्ण सेगमेंटमध्ये क्रांती घडवणारे ठरले आहेत. त्यामध्ये प्रमुख म्हणजे सॅमसंग निओ QLED तंत्रज्ञानावर आधारित हर्मन डिस्प्ले, इमर्सिव्ह डॉल्बी ॲटमॉस ऑडिओ सिस्टम, सर्वात खास म्हणजे 540 डिग्री सराऊंड व्ह्यू सिस्टम, जी कारच्या चारही बाजूंसह तिच्या खालचादेखील परिसर दाखवते – म्हणजेच एकही ब्लाइंड स्पॉट राहत नाही.
या प्रगत फीचर्समुळे हॅरियर.इव्ही ही फक्त एक इलेक्ट्रिक कार नाही, तर ती सुरक्षित, स्टायलिश, आणि भविष्यकाळासाठी सज्ज असलेली परफॉर्मन्स मशीन आहे.
कारची एक्स शोरूम स्वस्त मात्र ऑन रोड किंमत महाग, नक्की भानगड काय? सोप्या पद्धतीने जाणून घ्या
टाटा मोटर्सचा उद्देश भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाचे इलेक्ट्रिक वाहन अनुभव देण्याचा असून, हॅरियर.इव्ही ही त्या दिशेने टाकलेली एक क्रांतिकारी पाऊल आहे. ही कार केवळ इलेक्ट्रिक मोबिलिटीचे भविष्यच दर्शवत नाही, तर भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये ‘इंटेलिजंट एसयूव्ही’चा नवा अध्यायही सुरू करते.






