फोटो सौजन्य: Social Media
सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार अधिक पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय मानल्या जातात. सरकारही ग्रीन एनर्जी वापरास चालना देण्यासाठी विविध योजना आणि सवलती जाहीर करत आहे. इलेक्ट्रिक कार चालवणे किफायतशीर असून मेंटेनन्स खर्चही कमी आहे. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर भर देत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. हेच कारण आहे की कार उत्पादक कंपनी महिंद्रा त्यांच्या सर्वात लोकप्रिय SUV XUV 3XO चा इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
वाहनचालकांनो टेन्शन घ्यायची गरज नाही ! ‘या’ वाहनांना HSRP नंबरप्लेट अजिबात अनिवार्य नाही
ही कार टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. येत्या काही महिन्यांत महिंद्रा ही ईव्ही लाँच करू शकते. या ईव्हीचे डिझाइन, रेंज आणि संभाव्य फीचर्सबद्दल आज आपण जाणून घेऊया.
महिंद्रा XUV 3XO EV टेस्टिंग दरम्यान दिसली, ज्यावरून असे सूचित होते की ही कार तिच्या ICE व्हर्जन्सकडून बहुतेक डिझाइन एलिमेंट घेऊ शकते. या महिंद्रा ईव्हीमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, सी-आकाराचे एलईडी डीआरएल आणि कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प आहेत. याशिवाय, फीचर्सनुसार, ईव्हीमध्ये वायरलेस अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटोसह 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते.
तुम्हाला या कारच्या सर्फेस ट्रिम्स आणि मटेरियलमध्ये काही बदल दिसू शकतात. यासोबतच, ईव्हीमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा सिस्टम आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग प्रदान केले जाण्याची शक्यता आहे. याच्या पेट्रोल व्हर्जनबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा 3XO SUV ही 5 सीटर कॉम्पॅक्ट SUV आहे, जी 1197 cc ते 1498 cc, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक ईव्हीची खास गोष्ट म्हणजे त्याची रेंज. ईव्हीमध्ये पॉवरट्रेन म्हणून 34.5 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक प्रदान केला जाईल. ही ईव्ही एका चार्जवर सुमारे 400 किमीची रेंज देऊ शकते. याशिवाय, ईव्हीमध्ये डीसी फास्ट चार्जिंग दिले जाईल, ज्याची किंमत एक्स-शोरूममध्ये 10 लाख 50 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. ही किंमत अधिकृत नाही आणि कंपनीने याबाबत काही खुलासा देखील केला नाही.