फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)
आपली स्वतःची कार खरेदी करावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. त्यातही जर तुमची फॅमिली मोठी असेल तर मग 7 सीटर कार ही तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरेल. नुकतेच भारतीय मार्केटमध्ये एक अशी 7 सीटर कार चर्चेत आली आहे, जिला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आज ही कार देशातील सर्वात जास्त विकली जाणारी 7 सीटर कार बनली आहे.
भारतात विविध सेगमेंट कार्स उपलब्ध आहेत. यात MPV म्हणजेच मल्टी पर्पज व्हेईकल सेगमेंटमध्ये सातत्याने मागणी वाढताना दिसत आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या विक्रीत एकीकडे एमपीव्ही मॉडेल्सच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्याच वेळी काही वाहनांच्या विक्रीतही घट झाल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये Maruti Ertiga आणि Toyota Innova Hycross ने या सेगमेंटमध्ये पूर्वीप्रमाणेच आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. चला या कारच्या सेल्स रिपोर्टबद्दल जाणून घेऊया.
तरुणांची लोकप्रिय बाईक झाली अपडेट, भारतात नवीन Royal Enfield Hunter 350 झाली लाँच
मारुती एर्टिगा पुन्हा एकदा सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही बनली आहे. FY 25 मध्ये, कंपनीने 1.90 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत, जे मागील FY 24 पेक्षा सुमारे 41,000 युनिट्स जास्त आहे. हे या कारची 28 टक्के वाढ दर्शवते. ही अतिशय परवडणारी किंमत, उत्तम मायलेज आणि प्रॅक्टिकल डिझाइनसह येते, ज्यामुळे ही कार ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
FY 2025 मध्ये, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि क्रिस्टा यांनी एकत्रितपणे 1 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. या विक्रीत कंपनीने 9 टक्क्यांची वाढ पाहिली आहे. इनोव्हा क्रिस्टाच्या विश्वासार्हतेमुळे आणि हायक्रॉसच्या आधुनिक फीचर्समुळे, ही कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय कार राहिली आहे. दोन्ही कार्सनी त्यांच्या सेगमेंटमध्ये त्यांचे स्थान कायम ठेवले आहे.
2025 मध्ये Maruti Suzuki ‘या’ 2 SUVs आणायच्या तयारीत, ‘असा’ असेल कंपनीचा मास्टर प्लॅन
एमपीव्ही सेगमेंटमध्ये वाहनांच्या विक्रीत किया कॅरेन्सने आपले तिसरे स्थान पटकावले आहे. 2025 च्या आर्थिक वर्षात, या कारचे सुमारे 64,500 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीपेक्षा 2 टक्के जास्त आहे. प्रशस्त इंटिरिअर आणि फीचर्सपूर्ण पॅकेजमुळे ही कार भारतीय ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
Maruti XL6 आणि Invicto एकीकडे अनेक मॉडेल्सच्या विक्रीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे, मारुतीच्या एक्सएल6 च्या विक्रीत मोठी घट झाली आहे. प्रीमियम एमपीव्हीच्या विक्रीत 18 टक्क्यांनी घट झाली आहे आणि कंपनीला फक्त 37,000 युनिट्सपेक्षा थोडे जास्त विक्री करता आली आहे. दुसरीकडे, मारुती इन्व्हिक्टोबद्दल बोलायचे झाले तर, ही एमपीव्ही FY 2025 मध्ये 5,000 युनिट्सच्या विक्रीचा आकडाही ओलांडू शकली नाही. तसेच या कारच्या विक्रीत 8 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.