फोटो सौजन्य: X.com
भारतामध्ये स्कोडा कंपनी विविध सेगमेंटमध्ये आपली वाहने ऑफर करते. आता कंपनी लवकरच नवी Skoda Kushaq Facelift बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. या एसयूव्हीच्या लाँचपूर्वी स्कोडाकडून एक नवा टीझर जारी करण्यात आला असून, यामध्ये होणाऱ्या बदलांची झलक पाहायला मिळते. या फेसलिफ्टमध्ये नेमके कोणते बदल असू शकतात आणि ही एसयूव्ही कधी लाँच होणार? त्याबद्दल जाणून घेऊयात.
Hero Splendor साठी कमीतकमी किती Down Payment करावा लागेल? जाणून घ्या EMI
स्कोडा लवकरच नवी कुशाक फेसलिफ्ट भारतीय बाजारात दाखल करणार आहे. फेसलिफ्ट अपडेटमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून, त्यामुळे ही कार आधीपेक्षा अधिक आकर्षक आणि आधुनिक बनणार आहे.
लाँचपूर्वी स्कोडाकडून या एसयूव्हीचा नवा टीझर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये नवीन एक्सटिरिअर कलरसोबतच कारच्या फ्रंट आणि रियर डिझाइनची झलक दिसून येते.
टीझरनुसार, Kushaq Facelift मध्ये कनेक्टेड LED DRL देण्यात येणार आहेत. याशिवाय कनेक्टेड LED टेललाइट्स आणि नव्या डिझाइनच्या हेडलाइट्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसयूव्हीच्या इंजिन पर्यायांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. Skoda Kushaq Facelift मध्ये 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात येईल. यासोबतच सहा-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असतील.
काय सांगता! चक्क Tesla Cars वर मिळतंय डिस्काउंट, कोणता मॉडेल झाला स्वस्त? जाणून घ्या
कंपन्याकडून Skoda Kushaq Facelift मध्ये अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन आणि अधिक प्रगत इंफोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स, पॅनोरमिक सनरूफ तसेच Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System) सारख्या प्रगत सुरक्षा फीचर्सचा समावेश असू शकतो.
स्कोडाकडून Kushaq Facelift भारतात अधिकृतपणे 20 जानेवारीपर्यंत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. लाँचच्या वेळीच या एसयूव्हीची अचूक किंमत जाहीर केली जाईल. मात्र, फेसलिफ्ट अपडेटमुळे किंमतीत काही हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Skoda Kushaq ही मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये तिची स्पर्धा Maruti Grand Vitara, Hyundai Creta, Maruti Victoris, Volkswagen Taigun, आणि Kia Seltos या लोकप्रिय एसयूव्हींशी होणार आहे.






