Maruti E Vitara लवकरच होणार लाँच
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली मारुती सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी ई विटाराला हिरवा झेंडा दाखवतील. या संदर्भात सरकारने कोणती माहिती दिली आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Indian Motorcycle कडून ‘या’ अफलातून बाईक्स लाँच, सुरवातीची किंमतच 12.99 लाख रुपये
पंतप्रधान मोदी उद्या मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Maruti E Vitara ला हिरवा झेंडा दाखवणार आहे. उद्या गुजरातमधील हंसलपूर प्लांटला पंतप्रधान मोदी भेट देतील. या दरम्यान, पंतप्रधान मोदी मारुती ई विटाराच्या उत्पादन लाइनच्या लाँच प्रसंगी उपस्थित राहतील.
मारुतीची ही मेड-इन-इंडिया बीईव्ही (BEV) युरोप आणि जपानसह शंभरहून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.
Maruti E Vitara या एसयूव्हीमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स अशी फीचर्स देण्यात आली आहेत. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 ADAS यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध आहे. यासोबत 49 kWh आणि 61 kWh क्षमतेच्या बॅटरीचे पर्याय देण्यात येतील, ज्यामुळे या एसयूव्हीला 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज मिळणार आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही E Vitara च्या प्रॉडक्शन लाईनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर लवकरच ही एसयूव्ही जागतिक स्तरावर निर्यात केली जाईल. अशी अपेक्षा आहे की, पुढील काही महिन्यांत मारुती ही एसयूव्ही भारतीय बाजारातही सादर करेल.






