Maruti Fronx Facelift लवकरच होणार लॉन्च (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
समोर आलेल्या माहितीवरुन फ्रॉन्क्सच्या पुढील भागात नवीन डिझाइनची ग्रिल दिली जाणार असल्याचं दिसत आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ही ग्रिल अधिक स्टायलिश असेल. विशेषत: टर्बो व्हेरियंटमध्ये वेगळ्या रंगसंगतीचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे गाडीचा फ्रंट अधिक स्पोर्टी दिसेल.
समोर आलेल्या माहितीवरून फ्रॉन्क्सच्या पुढील भागात नवीन डिझाइनची ग्रिल दिली जाणार असल्याचं दिसत आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ही ग्रिल अधिक स्टायलिश असेल. विशेषतः टर्बो व्हेरियंटमध्ये वेगळ्या रंगसंगतीचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे गाडीचा फ्रंट अधिक स्पोर्टी दिसेल. याशिवाय समोरील बंपरमध्येही बदल करण्यात आले असून, नवीन स्किड प्लेटमुळे एसयूव्हीचा दमदार लूक अधिक खुलून येईल.
गाडीच्या साइड प्रोफाइलमध्येही हलके बदल अपेक्षित आहेत. नव्या डिझाइनची अलॉय व्हील्स दिली जाणार असल्याने फ्रॉन्क्स अधिक प्रीमियम वाटेल. मागील भागातही टेल लॅम्प्स आणि बंपरमध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. एकूणच बाहेरून फार मोठे बदल नसले तरी गाडी अधिक फ्रेश आणि आधुनिक दिसेल, असा अंदाज आहे.
या फेसलिफ्टमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान. चाचणीदरम्यान दिसलेल्या गाड्यांमध्ये समोरील लोगोखाली विशेष सेन्सर दिसून आला आहे. त्यामुळे फ्रॉन्क्समध्ये आता ADAS म्हणजेच प्रगत ड्रायव्हिंग सहाय्यक प्रणाली दिली जाऊ शकते. या सुविधेमुळे लेनमध्ये गाडी ठेवण्यास मदत, समोरील वाहनानुसार वेग नियंत्रित करणे आणि अचानक ब्रेक लावण्याची प्रणाली यांसारखी आधुनिक सुरक्षा फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
गाडीच्या केबिनमध्येही काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. सीटसाठी नवीन फॅब्रिक किंवा प्रीमियम अपहोल्स्ट्री मिळू शकते. पुढील सीट्सना व्हेंटिलेशनची सुविधा दिली जाऊ शकते, ज्यामुळे उन्हाळ्यात प्रवास अधिक आरामदायी होईल. याशिवाय सनरूफचीही भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रॉन्क्सची केबिन अधिक आधुनिक आणि आरामदायी वाटेल.
सध्याच्या मॉडेलमधील अनेक लोकप्रिय फीचर्स कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. वायरलेस मोबाईल चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, मागील प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स, उंची समायोजित करता येणारी ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल आणि ३६० अंश कॅमेरा यांसारख्या सुविधा नव्या मॉडेलमध्येही उपलब्ध राहतील. त्यामुळे ग्राहकांना तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांचा उत्तम अनुभव मिळेल.
MG Motor: 20 लाखात लाँच झाली MG Hector Plus Diesel, देणार Safari – Alcazar ला टक्कर
इंजिनच्या बाबतीत मात्र कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. कंपनी सध्याचं १.२ लिटर पेट्रोल इंजिन आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन कायम ठेवण्याची शक्यता आहे. तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध राहतील. म्हणजेच कामगिरी आणि ड्रायव्हिंग अनुभवात सातत्य राखत कंपनी मुख्यतः डिझाइन आणि फीचर्सवर भर देणार आहे.
याशिवाय पुढील काळात फ्रॉन्क्सच्या हायब्रीड मॉडेलचीही चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी काही वर्षांत स्वतः विकसित केलेली स्ट्राँग हायब्रीड प्रणाली या गाडीत आणू शकते. या तंत्रज्ञानामुळे इंधनाचा वापर कमी होण्यास मदत होईल. काही अहवालांमध्ये या गाडीचं मायलेज तब्बल ३५ किमी प्रति लिटरपर्यंत जाऊ शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर हे प्रत्यक्षात आलं, तर इंधन बचतीच्या बाबतीत फ्रॉन्क्सला मोठा फायदा मिळू शकतो.
बँक लिलावातून स्वस्तात कार खरेदी करताय? जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि धोके
एकंदरीत पाहता, नव्या फ्रॉन्क्समध्ये आकर्षक डिझाइन, अधिक सुरक्षितता, आधुनिक फीचर्स आणि भविष्यात हायब्रीड तंत्रज्ञानाची जोड मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे मॉडेल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार, यात शंका नाही.






