फोटो सौजन्य: @throttleandtech/ X.com
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची आणि लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Victoris लाँच केली होती. ही कार लाँच होताच ग्राहकांमध्ये या कारबाबत उत्सुकता वाढली होती. म्हणनूच तर लाँचच्या पहिल्या महिन्यात, 4,261 युनिट्स विकल्या गेल्या. शिवाय, कंपनीला 25,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत, जे Victoris साठी ग्राहकांमध्ये असलेल्या प्रचंड उत्साहाचे प्रतीक आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये 5,698 युनिट्स विकल्या गेल्याने ग्रँड विटारा अजूनही विक्रीत आघाडीवर आहे. तरीही, व्हिक्टोरिसच्या सुरुवातीच्या यशावरून असे दिसून येते की ही एसयूव्ही येत्या काही महिन्यांत आणखी चांगली कामगिरी करू शकते.
मारुती सुझुकीने Victoris ची विक्री त्यांच्या Arena डीलरशिप नेटवर्कद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे, तर ग्रँड व्हिटारा नेक्सा चॅनेलद्वारे विकली जाते. एरिना नेटवर्कचे देशभरात 2,500 हून अधिक टचपॉइंट्स आहेत, ज्यामुळे व्हिक्टोरिसला लहान शहरं आणि ग्रामीण बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सोपे होते. या धोरणामुळे व्हिक्टोरिसच्या विक्रीत लक्षणीय वाढ होऊ शकते, कारण एरिना नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल विक्री चॅनेलपैकी एक आहे.
ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स
मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची किंमत 10.5 लाख ते 19.9 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही एसयूव्ही तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: 1.5-लिटर माइल्ड हायब्रिड पेट्रोल, 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल आणि 1.5-लिटर एस-सीएनजी व्हेरिएंट. हे व्हेरिएंट विविध ग्राहक वर्गाला लक्ष्य करतात.
मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मॉडर्न एसयूव्ही मानली जाते. या एसयूव्हीमध्ये Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System), व्हेंटिलेटेड सीट्स, डॉल्बी अॅटमॉस साउंड सिस्टम, 360° कॅमेरा, टीपीएमएस आणि फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स सारख्या हाय-टेक फीचर्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि पॉवर्ड बूट रिलीज सिस्टम सारखी फीचर्स तिला प्रीमियम फील देतात.
‘या’ बजेट फ्रेंडली बाईक्स म्हणजे मार्केटच्या शान! किंमत 1 लाखांपेक्षा कमी
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही मारुती सुझुकी व्हिक्टोरिस चांगली कामगिरी करते. Bharat NCAP आणिGlobal NCAP या दोन्हींकडून तिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्ज, ईएसपी, एबीएस + ईबीडी, हिल-होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारख्या फीचर्सचा समावेश आहे.