फोटो सौजन्य: @carandbike/X.com
Bajaj Chetak C25 मध्ये 2.5 kWh क्षमतेची NMC बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्जवर ही स्कूटर सुमारे 113 किलोमीटरची रेंज देतो. शहरातील दैनंदिन प्रवास लक्षात घेऊन ही स्कूटर डिझाइन करण्यात आली आहे. यासोबत 750W ऑफ-बोर्ड चार्जर मिळतो, ज्यामुळे केवळ 2 तास 25 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्जिंग पूर्ण होते. हे फास्ट चार्जिंग फीचर या सेगमेंटमध्ये स्कूटरला अधिक उपयुक्त बनवते.
नवीन चेतक C25 आपल्या क्लासिक मेटल बॉडी डिझाइनसह सादर करण्यात आला आहे, जे आधीपासूनच त्याची ओळख ठरली आहे. यात 25 लिटर क्षमतेचा मोठा बूट स्पेस देण्यात आला असून, त्यात हेल्मेटसह दैनंदिन वापरातील वस्तू सहज ठेवता येतात. ही स्कूटर Chetak 3501, 3502, 3503 आणि 3001 या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार पर्याय निवडता येतात.
Bajaj चा इलेक्ट्रिक टू-व्हीलर व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. 2025 मध्ये कंपनीची विक्री 2,69,836 युनिट्सपर्यंत पोहोचली असून, ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 39 टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे Bajaj ची बाजारातील हिस्सेदारी 21 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये Bajaj Auto प्रथमच देशातील नंबर 1 ई-टू-व्हीलर कंपनी ठरली होती, तर मार्चमध्ये कंपनीने 35,214 युनिट्सची विक्रमी विक्री नोंदवली.
दरम्यान, Bajaj Auto सातत्याने आपल्या चेतक नेटवर्कचा विस्तार करत आहे. सध्या देशभरात 390 एक्सक्लूसिव्ह स्टोअर्स, 500 हून अधिक शहरांमध्ये 4,280 सेल्स पॉइंट्स आणि 4,100 पेक्षा जास्त सर्व्हिस वर्कशॉप्स कार्यरत आहेत. 2025 दरम्यान भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असून, यामध्ये ई-टू-व्हीलर सेगमेंटचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.






