फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये Mahindra ने आपला झेंडा रोवला आहे. कंपनीने त्यांच्या नवीन आयसीई एसयूव्ही, ICE SUV Mahindra XUV 7XO आणि इलेक्ट्रिक SUV Mahindra XEV 9S साठी बुकिंग सुरू केली. या दोन्ही वाहनांना पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत, कंपनीला एकूण 93,689 बुकिंग मिळाले, जे एक मोठा विक्रम आहे.
Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?
खरं तर, महिंद्राचे यश केवळ बुकिंगच्या संख्येपुरते मर्यादित नाही. कंपनीच्या मते, एक्स-शोरूम किमतींवर आधारित या बुकिंगचे एकूण व्हॅल्यू 20,500 कोटींपेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी भारतीय ग्राहकांचा एसयूव्ही विभागातील नवीन आणि टेक्नॉलॉजी-केंद्रित उत्पादनांवर असलेला विश्वास स्पष्टपणे दर्शवते. विशेष म्हणजे, ग्राहक आयसीई आणि इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन्ही स्वीकारत आहेत.
Mahindra XUV 7XO आणि XEV 9S या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेल्या एसयूव्ही आहेत. XUV 7XO ही पारंपरिक ICE SUV असून यात पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. ही SUV कुटुंबासाठी योग्य वापर, आधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स यांचा समतोल साधते.
दुसरीकडे, XEV 9S ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असून भविष्यातील मोबिलिटी आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार करून विकसित करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता XEV 9S ला मिळणाऱ्या चांगल्या बुकिंगमुळे महिंद्राची रणनीती योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होते.
नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत
ऑटो क्षेत्रातील तज्ञांच्या मते, येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा आणखी वाढणार आहे. XEV 9S सारख्या इलेक्ट्रिक SUVs मुळे महिंद्राला EV सेगमेंटमध्ये भक्कम स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, XUV 7XO सारखी ICE मॉडेल्स अजूनही इलेक्ट्रिक वाहनांकडे पूर्णपणे वळण्यास तयार नसलेल्या ग्राहकांसाठी आकर्षक ठरणार आहेत.
एकूणच, महिंद्रा XUV 7XO आणि XEV 9S ला पहिल्याच दिवशी मिळालेली भरघोस बुकिंग भारतीय SUV बाजारात महिंद्राचे वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याचे दाखवते. 20,500 कोटी रुपयांहून अधिक बुकिंग मूल्य आणि सुमारे 94 हजार ऑर्डर्स ही कोणत्याही ऑटोमोबाईल कंपनीसाठी मोठी कामगिरी मानली जाते.






