ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांपैकी एक म्हणजे जपान. जपानची प्रसिद्ध आलिशान कार उत्पादक कंपनी ‘लॅक्सस’ने आपली नवीन ES 350h ही हायब्रिड कार भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे विक्रीसाठी आणली आहे. या कारची सुरुवातीची अंदाजे किंमत ६६ लाख १० हजार रुपये असून, तिचे उत्पादन भारतामध्येच केले जाणार आहे. ही कार पर्यावरणपूरक असण्यासोबतच आरामदायी प्रवासासाठी उत्तम पर्याय मानली जात आहे.
आकर्षक बाह्य रचना आणि केबिनमधील मोकळी जागा
या नवीन मॉडेलचा आकार जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठा करण्यात आला आहे, ज्यामुळे कारच्या आत प्रवाशांसाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होते. कारच्या पुढच्या भागाची रचना पूर्णपणे वेगळी आणि बंद स्वरूपाची असून, त्याला अधिक आधुनिक रूप देण्यात आले आहे. कारच्या मागील बाजूस जोडलेली एलईडी लाईट्स आणि पुढील बाजूचे स्पेशल हेडलाईट्स या कारला अधिक सुंदर लूक देतात.
पावरफुल हायब्रिड इंजिन आणि स्पीड
या कारमध्ये २.५ लिटर पावरचे चार सिलेंडर असलेले हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर मिळून २४४ हॉर्सपॉवरची प्रचंड ताकद निर्माण करतात. यामुळे ही कार अवघ्या ७.७ सेकंदात ताशी शंभर किलोमीटरचा वेग पकडू शकते. कंपनीने या इंजिन आणि बॅटरीसाठी ८ वर्षे किंवा २ लाख किलोमीटरपर्यंत एवढी मोठी वॉरंटी दिली आहे.
ARAI काय आहे? भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी ARAI कोणती भूमिका पार पाडते?
प्रीमियम फीचर्स आणि प्रवाशांची सुरक्षा
कारच्या आत दुहेरी रंगाचे उत्तम दर्जाचे कातडी लेदर वापरण्यात आले असून, मध्ये १४ इंचाची मोठी टचस्क्रीन दिली आहे. प्रवाशांसाठी १७ स्पीकरची साउंड सिस्टम, दोन्ही रो मध्ये हिटकंट्रोल करणाऱ्या जागा आणि हाताच्या सेन्सर्सने उघडणारे सामानाचे कप्पे यांसारख्या आधुनिक सुविधा यात आहेत. सेफ्टीच्या दृष्टीने कारमध्ये १० एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा आणि रडारवर आधारित ADAS यांसारखी सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत.






