'...तर चीनला रोखणार नाही' ; सोनम वांगचुक भारतावरील 'त्या' विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांच्या ज्युन्या आंदोलनाचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, जर चीने भारतावर हल्ला, तर लडाखचे लोक त्याला रोखणार नाहीत. उलट त्यांना भारतात येण्यासाठी मदत करतील. ही छोटीशी क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला जात आहे. त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
परंतु व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काही औरच आहे. हा व्हिडिओ अर्थवट असून चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आला आहे. याच्या मूळ व्हिडिओत वांगचुक त्यांना लडाखमधील एका स्थानिक कॉमेडियनच्या विधानांवर त्यांचे मत मांडत आहे. मूळ व्हिडिओ हा १ मिनिटं ३७ सेकंदाचा आहे.
यामध्ये ते म्हणत आहे की, लडाखमधील एका कॉमेडियनने म्हटले की, चीन जेव्हा सीमेवरुन भारतात घुसखोरी करतो, तेव्हा लडाखचे लोक त्याला रोखण्यासाठी जीवाची बाजी मारतात. पण भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. असे असेल तर आम्ही पुढच्या वेळी चीनला भारतात येण्यास मदत करु. आमचे संरक्षण होत नसेल, तर आम्ही जीव का देऊ? असा प्रश्न त्या कॉमेडियनने केला.
यावर वांगचुक यांनी म्हटले की, कॉमेडियनचे हे वक्तव्य देशद्रोह नसून, अनेक वर्षांपासून सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे निर्माण झालेला आक्रोश आणि निराशा आहे. यामुळे सरकारने लोकांवर कारवाई न करता, चीनला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
“If China invades India through Ladakh, we will not stop China but will show path to China getting inside” – Sonam Wangchuk during Ladakh fasting which eventually led to riots killing many ppl pic.twitter.com/esVL0GZ85z — Rishi Bagree (@rishibagree) July 13, 2026
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






