फोटो सौजन्य: @AckoDrive (X.com)
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सना धमाकेदार मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत होत्या, त्याच आज इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेषलक्ष केंद्रित करत आहे.
भारतात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक कंपनी. टाटाने देशात अनेक कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच केले आहे. नुकतेच कंपनीने Tata Harrier EV चा Stealth Edition लाँच केला आहे. चला या नवीन कारबद्दल जाणून घेऊयात.
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने टाटा हॅरियर ईव्हीचा नवीन एडिशन लाँच केला आहे. या एसयूव्हीची स्टील्थ एडिशन देखील बाजारात लाँच करण्यात आली आहे. ही एडिशन रियर व्हील ड्राइव्ह आणि क्वाड व्हील ड्राइव्ह या दोन पर्यायांमध्ये दिली जात आहे.
Kia Carens Clavis EV होऊ शकते देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर Electric MPV, केव्हा होणार लाँच?
या एडिशनचे एकूण चार व्हेरिएंट कंपनीने ऑफर केले आहेत. यापैकी दोन रियर व्हील ड्राइव्ह आणि दोन क्वाड व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजीसह येतील. यामध्ये Empowered 75 Stealth, Empowered 75 Stealth ACFC, Empowered QWD 75 Stealth और Empowered QWD 75 Stealth ACFC व्हेरिएंटचा समावेश आहे.
कंपनीने टाटा हॅरियर ईव्हीच्या स्टील्थ एडिशनमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात बूस्ट मोड, ऑफ रोड असिस्ट, नॉर्मल, स्नो, ग्रास, मड, वाळू, रॉक आणि कस्टम टेरेन मोड्स, मॅट स्टील्थ ब्लॅक पेंट स्कीम, कार्बन लेदरेट सीट्स आणि इंटीरियर, 19 इंच पियानो ब्लॅक अलॉय व्हील्स, ऑटो पार्क असिस्ट, लेव्हल-2 एडीएएस, 540 डिग्री व्ह्यू कॅमेरा, 36.9 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर्ड टेलगेट, जेबीएलचा 10 स्पीकर ऑडिओ सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, अँबियंट लाईट असे अनेक फीचर्स आहेत.
इतिहास घडला ! पहिल्यांदाच ड्रायव्हर शिवाय खरेदीदाराच्या घरी पोहोचली Tesla ची कार, भारतात होणार लाँच?
75 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह टाटाने हॅरियर ईव्ही सादर केली आहे. यामुळे एसयूव्हीला एका चार्जवर 627 किमीची एमआयडीसी रेंज मिळते. वास्तविक जगातील रेंज सुमारे 480 ते 505 किमी आहे. यात असलेली पीएमएसएम मोटर तिला 238 पीएस पॉवर आणि 315 न्यूटन मीटर टॉर्क देते.
टाटा हॅरियर ईव्ही स्टील्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 28.24 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 30.23 लाख रुपयांपर्यंत जाते.