इलेक्ट्रीक मोटारसायकल असली तरी या गाडीचे फिचर्स पाहून ती विकत घ्यावी असं नक्कीच वाटेल. Rorr EVO ही रोजच्या वापरासाठी सर्वात जास्त सोयीस्कर आहे असं या कंपनीचं म्हणणं आहे. फक्त फिटर्सच नाही तर या मोटरसायकलचं डिझाईन देखील तितकेच भारी आहेत.
Ampere ची Magnus Neo Electric Scooter लाँच; फुल चार्ज केल्यावर मिळतेय 118 किमीची रेंज…
ओबेन रोर ईव्हीओ इलेक्ट्रिक मोटरसायकल: डिझाइन
पुढच्या बाजूला सिग्नेचर फ्रंट पोझिशन लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना या गाडीचा रुबाब अधिक दिसून येतो. Oben Rorr EVO Electric मोटरसायकलच्या फिचर्सबाबत सांगायचं तर 180 किमी रेंज AL Ride Mode हे सगळं यात देण्यात आलं आहे. या गाडीला त्याच कंपनीचं म्हणजेच ओबेन प्लग (फास्ट चार्जर) वापरून हे फक्त 90 मिनिटांत चार्जिंग होते. दैनंदिन चार्जिंगसाठी यात ओबेन पोर्ट, त्याचा ऑनबोर्ड चार्जर, दिलेला आहे. विशेष म्हणजे, स्थिर स्थितीतून ताशी 40 किमीचा वेग गाठायला याला फक्त 3 सेकंद लागतात.
याच्या रायडींग मोडला Smart IQ आहे. त्यामुळे रायडिंगच्या पद्धतींचे रिअल-टाइममध्ये रेंज 15 % पर्यंत वाढवण्यासाठी पॉवर डिलिव्हरीला ऑप्टिमाइझ करतो.रायडरच्या वर्तनानुसार आपोआप जुळवून घेत, स्मार्टआयक्यू मॅन्युअल सेटिंग्ज कराव्या लागत नाही , ज्यामुळे परफॉर्मन्स जास्त वाढतो.
बॅटरी सिस्टिम
या मोटरसायकलला पॉवर देण्यासाठी IP68-रेटेड मोटर वापरली आहे. Rorr EVO मध्ये ओबेनची स्वतःची 3.4 kWh क्षमतेची उच्च-कार्यक्षमता असलेली LFP बॅटरी बसवलेली आहे. ही बॅटरी पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत 50% जास्त हिट कमी करते आणि मोटारसायकलीचे आयुष्य वाढवते. ही बॅटरी अधिक चांगल्या आघात प्रतिरोधकतेसाठी एका मजबूत ॲल्युमिनियम संरचनेत बसवलेली आहे आणि त्यावर 8 वर्षांची वॉरंटी आहे, ज्यामुळे दीर्घकाळ मालकीचा विश्वास वाढतो.
सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी हे देखील रोर इव्होच्या अनुभवाचे अविभाज्य भाग आहेत. या मोटरसायकलमध्ये ‘फॉल अलर्ट विथ इमर्जन्सी असिस्ट’ हे वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे, जे पडणे ओळखते आणि ओबेन ॲपद्वारे अलर्ट पाठवते, तसेच आवश्यक असल्यास आपत्कालीन संपर्कांना सूचित करते. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये युनिफाइड ब्रेक असिस्ट (UBA), ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम (DAS), सुरक्षित चार्जिंग आणि सुधारित स्थिरतेसाठी रुंद मागील टायर यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये खळबळ! Tesla च्या Model YL ची भारतात एन्ट्री, काय आहेत फीचर्स?
Rorr EVO मध्ये 5-इंचाचा कलर TFT डिस्प्ले आहे, जो नेव्हिगेशन, राइड डेटा आणि कॉल, टेक्स्ट व म्युझिकसाठी स्मार्ट अलर्ट्स देतो. ओबेन इलेक्ट्रिक ॲपद्वारे, रायडर्सना राइड हिस्ट्री, जिओ-फेन्सिंग, रिमोट डायग्नोस्टिक्स, थेफ्ट प्रोटेक्शन, ‘फाइंड माय Rorr’ आणि 24 तास सर्व्हिस सपोर्ट मिळतो. यासोबतच, त्यांना 68 हजार पेक्षा जास्त चार्जिंगच्या नेटवर्कचा ॲक्सेस मिळतो, ज्यामुळे एक पूर्णपणे कनेक्टेड मालकीचा अनुभव सुनिश्चित होतो.
ओबेन रोर इव्हो इलेक्ट्रिक मोटरसायकल: रंग आणि किंमत
रोर इव्हो पल्स रेड, न्यूट्रॉन ब्लू, मॅग्नेटिक ब्लॅक आणि फोटॉन व्हाईट या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही मोटरसायकल पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी 99 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) या प्रास्ताविक किमतीत उपलब्ध आहे, त्यानंतर तिची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) असेल. फक्त 777 रुपयांमध्ये बुकिंग आता सुरू झाले असून, देशभरातील ओबेनच्या 150 शोरूम्समध्ये जून 2026 पासून टेस्ट राईड आणि ग्राहकांना डिलिव्हरी देण्यास सुरुवात होणार आहे.






